पोलिस भरतीचा अर्ज भरण्यास मुदतवाढ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिस भरतीचा अर्ज भरण्यास मुदतवाढ

उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा 15 डिसेंबरपर्यंत भरता येणार अर्ज

मुंबई प्रतिनिधी - पोलिस भरती अर्ज भरतांना उमेदवारांना अनेक तांत्रिक अडचण निर्माण होत होती. सर्व्हर डाऊनमुळे अनेक उमेदवार अर्ज भरू शकले नव्हते. त्यामु

गृहखात्याचा मोठा निर्णय, मुंबईत ३ हजार कंत्राटी पोलीस भरती
राज्यभरात आजपासून पोलिस भरती
कंत्राटी पोलिस भरतीवरून विरोधकांनी घेरले  

मुंबई प्रतिनिधी – पोलिस भरती अर्ज भरतांना उमेदवारांना अनेक तांत्रिक अडचण निर्माण होत होती. सर्व्हर डाऊनमुळे अनेक उमेदवार अर्ज भरू शकले नव्हते. त्यामुळे पोलिस भरतीचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येत होती, अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस भरतीचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा केल्यामुळे उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
अर्ज भरण्यासाठी आता 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून फडणवीस यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.फडणवीस म्हणाले की, आतापर्यंत आमच्याकडे 11 लाख 80 हजार अर्ज आलेले आहेत. तथापि काही ठिकाणांहून ही तक्रार येते आहे की, तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

COMMENTS