Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रिचा चड्ढाकडून भारतीय सेनेचा अपमान; ट्विटरवर संताप व्यक्त

देशाच्या जवानांची रिचा चड्डा हीने माफी मागावी

अभिनेत्री रिचा चड्ढा नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे किंवा ट्विट्समुळे चर्चेत असते. नुकतंच तिने  उत्तरी लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेद

गृहमंत्र्यांनी महिला सुरक्षेकडे लक्ष द्यावे
थंडीचा कहर, कानपुरात 25 जणांचा मृत्यू
पाटण तालुक्यातील शिवसेना उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी; पाटण येथील बैठकीत निर्णय

अभिनेत्री रिचा चड्ढा नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे किंवा ट्विट्समुळे चर्चेत असते. नुकतंच तिने  उत्तरी लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या एका विधानावर तिने हे ट्विट केलंय. भारतीय सेना ही पाकव्याप्त काश्मीरला पुन्हा मिळवण्यासारखे आदेश अंमलात आणण्यास तयार आहे, त्यांचं हेच विधान शेअर करत रिचाने ‘गलवानने हाय असं ट्विट केलंय. त्यावर आता आमदार राम कदम चांगलेच भडकले आहेत. सिनेअभिनेत्री रिचा चड्डा चर्चेत येण्यासाठी आपल्या जवानांचा अपमान करणार का ? जवान आपल्या कुटुंबाला सोडुन दिवस- रात्र आपल्या रक्षणासाठी देशाच्या सीमेवर उभे असतात. वेळ आल्यास तर आपल्या जिवाची देखील पर्वा न करता आपल्या प्राणांची आहुती देतात. अलिशान बंगल्यात बसुन अश्या प्रकारची मानसिकता ठेवणारी अभिनेत्री स्वत:ला समजते कोण? देशाच्या जवानांची रिचा चड्डा हीने माफी मागावी  अशी मागणी त्यांनी केली आहे.

COMMENTS