Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

केरळमध्ये मान्सून पोहोचण्यास विलंब

पुणे/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून महाराष्टांत ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. दोन दिवसांपासून राज्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या असून, त

काँगे्रससमोर पक्षफुटीचे आव्हान
नागपुरात तीन कामगारांचा होरपळून मृत्यू
ससेवाडी येथील शेतकर्यांचे मुलं झाले पोलीस

पुणे/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून महाराष्टांत ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. दोन दिवसांपासून राज्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या असून, त्यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र मान्सूनला विलंब होत असून, महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
मान्सून 4 दिवस विलंबनाने म्हणजे येत्या 8 जूनपर्यंत केरळमध्ये धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने सोमवारी व्यक्त केला आहे. यापूर्वी तो 4 जूनपर्यंत केरळमध्ये पोहोचणे अपेक्षित होते. हवामान खात्याच्या माहितीनुसार, मध्य प्रदेश व राजस्थानसह 6 राज्यांमध्ये पुढील 3 दिवस पावसाची शक्यता आहे. बिहार व उत्तर प्रदेशासह 6 राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये रविवारी सायंकाळी वादळामुळे गंगेत 9 जण बुडाले. यापैकी दोघांचे मृतदेह सोमवार सकाळपर्यंत बाहेर काढण्यात यश आले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 8 जूनपर्यंत केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक व ओडिशामध्ये धुळीच्या वादळासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर बिहार, पश्‍चिम बंगाल, ईशान्य आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, सिक्कीम, झारखंड व उत्तर प्रदेशात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. अंदमान व निकोबार बेटसमूह तथा लक्षद्वीपमध्येही पाऊस अपेक्षित आहे. इतर राज्यांमध्ये हवामान सामान्य असेल. आयएमडीच्या माहितीनुसार, दक्षिणपूर्व अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होत आहे. त्याचे हळूहळू कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर होत आहे. येत्या दोन दिवसांत तो आणखी मजबूत होईल, त्यामुळे केरळच्या दिशेने मान्सूनच्या वाटचालीत अडथळा निर्माण झाला आहे.

COMMENTS