Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार; राज्यमंत्रीही घेणार शपथ

मुंबई / प्रतिनिधी : एकनाथ शिंदे सरकारमधील दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. यावेळी राज्यमंत्रीही शपथ घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री

औंधच्या 16 गावच्या सिंचन योजनेला निधी उपलब्ध करणार : ना. अजित पवार
गुरुकुल स्कूल ठरली संपूर्ण लसीकरण करणारी सातारा जिल्ह्यातील पहिली शाळा
सातारा जिल्ह्यात पाचशे एकरावर कृषी उद्योग उभारणी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई / प्रतिनिधी : एकनाथ शिंदे सरकारमधील दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. यावेळी राज्यमंत्रीही शपथ घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे आता या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळतेय हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आत्तापर्यंत राज्यात फक्त कॅबिनेट मंत्र्यांचाही शपथविधी झाला आहे. राज्यमंत्री म्हणून कोणीही शपथ घेतली नव्हती. त्यामुळे पुढच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळेल हे पहाणे औत्सुक्याचे असणार आहे. पण हा मंत्रिमंडळ विस्तार नक्की कधी होईल याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आली नाही. पण लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार होईल, अशी माहिती फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
बच्चू कडू यांची नाराजी दूर होणार का?
शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाला अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर शिंदे यांच्या गटाचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला संधी मिळेल, अशी आशा कडू यांना होती. पण तसे घडले नाही, त्यामुळे त्यांनी अनेकदा जाहीररित्या नाराजी व्यक्त केली होती. पण आपल्याला मंत्रिपद मिळेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे पुढच्या मंत्रिमंडळात बच्चू कडू यांना संधी मिळतेय का हे औत्सुक्याच ठरणार आहे.

COMMENTS