Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लव्ह-जिहाद-धर्मांतरसह महामानवांच्या अवमानाबद्दल पाटण येथे निषेध मोर्चा

पाटण / प्रतिनिधी : लव जिहादचा आणि धर्मांतर विरोधी कायदा करण्यासाठी तसेच तालुक्यातील पेठशिवापूर (मोरगिरी) येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अ

कुटुंबियांना मारण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार
कराड तालुका स्वस्त धान्य दुकानदारांचे लाक्षणिक उपोषण
४०० फूट खोल दरीत कोसळणारी कार झाडावर अडकली l LokNews24

पाटण / प्रतिनिधी : लव जिहादचा आणि धर्मांतर विरोधी कायदा करण्यासाठी तसेच तालुक्यातील पेठशिवापूर (मोरगिरी) येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराचा निषेधार्थ व छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणार्‍यांच्या निषेधार्थ पाटण तालुक्यातील समस्त हिंदू समाज्यातर्फे पाटण येथे विराट हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
मंगळवारी सकाळी 10 वाजलेपासून रामनगर येथे तालुक्यातील विविध भागातून हिंदू बांधव भगिनी मोठ्या संख्येने हजर होत होते. नंतर 12 वाजता मोर्चास सुरवात झाली. हा मोर्चा पंचशील हॉटेल रामनगर-हनुमान मंदिर रामपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नवीन बसस्थानक-झेंडा चौक-लायब्ररी चौकातून हनुमान मंदीराला वळसा घालून पाटण नगरपंचायत मैदानावर स्थिरावला. मोर्चात भगव्या टोप्या, हातात भगवे ध्वज घेतलेले हिंदू बांधव भगिनीं छत्रपती शिवाजी महाराज की जय, हिंदू धर्माचा विजय असो अशा घोषणा देत आसमंत दणाणून सोडला. जुनी नगरपंचायत येथे उभारलेल्या व्यासपीठावर समोर मोर्चाचे छोटेखानी सभेत रुपातर झाले. सर्व प्रथम व्यासपीठावर ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित हिंदू भगिनींनी लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा, तसेच मोरगिरी येथे झालेल्या हिंदू मुलीवर केलेल्या आत्याचार बाबत तीव्र संताप व्यक्त करून हिंदू भगिनींनी आत्मनिर्भर बनून लव्ह जिहादला बळी न पडता शिवछत्रपतींच्या विचारावर वाटचाल करणे गरजेचे असल्याचे आवाहन केले. तसेच अन्यथा आत्याचाराविरोधात पेठून उठून हिंदू भगिनींवर, शालेय मुलींवर वाईट नजर ठेवणार्‍या प्रवृत्तींना जागीच ठेचले पाहिजे, अशा संतप्त भावना या भगिनींनी व्यक्त केल्या.

COMMENTS