भररस्त्यात कॉन्स्टेबल आणि होमगार्डमध्ये सिनेस्टाईल हाणामारी

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

भररस्त्यात कॉन्स्टेबल आणि होमगार्डमध्ये सिनेस्टाईल हाणामारी

यासंदर्भात पोलीस अधीक्षक रवी कुमार यांनी चौकशीचे आदेश दिले

उत्तरप्रदेश प्रतिनिधी -  सोशल मीडियाला व्हायरल व्हिडीओ चे व्यासपीठ मानलं जातं. कारण, सध्या सोशल मीडियावर होमगार्ड आणि पोलीस कॉंस्टेबलमध्ये झालेल्या ह

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लक्षवेधी टरबूज आंदोलन
महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भाजपा केंद्र सरकारचा निषेध मोर्चा
साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी दूरगामी धोरण आखा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

उत्तरप्रदेश प्रतिनिधी –  सोशल मीडियाला व्हायरल व्हिडीओ चे व्यासपीठ मानलं जातं. कारण, सध्या सोशल मीडियावर होमगार्ड आणि पोलीस कॉंस्टेबलमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत होमगार्ड हा पोलीस कॉंस्टेबलला लाथा बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहे.  ही घटना उत्तरप्रदेशातील जालौन शहरातील आहे. येथील रामपुरा ठाणे हद्दीतील जगम्मनपूर परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. दरम्यान, हाणामारीचा व्हिडीओ समोर येताच जालौनचे पोलीस अधीक्षक रवी कुमार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

COMMENTS