आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र

Homeताज्या बातम्यालाईफस्टाईल

आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र

आज ६ सप्टेंबर

मेष-  कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. दिवस हसत-खेळत घालवाल. खर्च करू की नको असा संभ्रम निर्माण होईल. कार्यक्षेत्रात जबाबदार्‍या वाढतील. हातातील काम न

ऑक्सिजन तुटवड्यावरुन रामदेव बाबांचं वादग्रस्त वक्तव्य | सकाळच्या ताज्या बातम्या | LokNews24
जामखेड तालुक्यातील तीन रस्ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण
पैगंबरांच्या अपमानचा बदला घेण्यासाठीच उमेश कोल्हेंची हत्या

मेष–  कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. दिवस हसत-खेळत घालवाल. खर्च करू की नको असा संभ्रम निर्माण होईल. कार्यक्षेत्रात जबाबदार्‍या वाढतील. हातातील काम नेमकेपणाने कराल. शुभ रंग जांभळा  शुभ अंक  ८

वृषभ :- अडकलेल्या व्यवहाराला गती मिळेल. घरातील कामे पूर्ण कराल. मनातील ध्यास पूर्ण होईल. राजकीय स्पर्धक पुढे जाण्याचा प्रयत्न करतील. आजचा दिवस मनासारखा जाईल. शुभ रंग लाल शुभ अंक ५

मिथुन :- चंचलतेला आवर घाला. लोकांच्या वागण्याचा अचंबा वाटेल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. मनात उगाचच शंका निर्माण होतील. प्रेमातील व्यक्तीने नातेसंबंध दृढ होतील. शुभ रंग विटकरी शुभ अंक २

कर्क :- तुमची बौद्धिक तपासणी केली जाऊ शकते. जोडीदाराच्या स्वभावात शांतपणा जाणवेल. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. कामातील बदल योग्य वेळी लक्षात घ्या. मनातील आकांक्षेपुढे बाकी गोष्टी गौण वाटतील. शुभ रंग निळा शुभ अंक ९

सिंह :- आत्मविश्वासाला तडा जाऊ देऊ नका. स्वत:साठी थोडा वेळ काढावा. मित्रांशी सलोख्याच्या गप्पा होतील. भाग्याची भक्कम साथ मिळेल. भौतिक सुखात वाढ होईल. शुभ रंग पोपटी शुभ अंक ६

कन्या :- मोठी खरेदी केली जाऊ शकते. अभ्यासात कमी पडू नका. आपले विचार अधिक स्पष्टपणे मांडाल. सहकारी कामात मदत करतील. मित्र परिवारात वाढ होईल. शुभ रंग हिरवा शुभ अंक ३

तूळ :- जोडीदाराचा स्वभाव ओळखून उत्तर द्या. काही बाबी स्वीकाराव्या लागतील. महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करावी. जुगारातून धनलाभ संभवतो. अधिकार्‍यांचे मार्गदर्शन घेऊनच कामे करा. शुभ रंग गुलाबी शुभ अंक ७

वृश्चिक :- शैक्षणिक गोष्टी मार्गी लागतील. सरकारी कामे पुढे सरकतील. भावंडांशी नाते दृढ होईल. कर्तुत्वाला चांगला वाव आहे. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. शुभ रंग पिवळा शुभ अंक ४

धनू :- तुमच्यातील कलागुणांचे कौतुक केले जाईल. जवळचे नातेवाईक भेटतील. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. बोलण्यातून गैरसमज पसरवू नका. व्यवसाय विस्ताराच्या योजना आखाल. शुभ रंग पांढरा शुभ अंक १

मकर :- तुमच्यातील न्यायीपणा उपयोगी पडेल. जोडीदार तुमच्यावर खुश राहील. भागीदारीत सावधानता बाळगावी. कौटुंबिक वातावरण शांत ठेवा. मालमत्तेचे वाद मिटतील. शुभ रंग काळा शुभ अंक ४

कुंभ:- तुमच्यातील सद्गुणांची वाढ होईल. तडकाफडकी कामे करू नका. सारासार विचार करण्यावर भर द्या. घरातील वातावरणात दिवस मजेत जाईल. सरकारी योजनांचा लाभ घ्यावा. शुभ रंग नारंगी शुभ अंक ६

मीन :- घाईघाईने निर्णय घेऊ नयेत. उतावीळपणे खर्च करू नका. एखादी गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरेल. भावनेला आवर घालावी लागेल. प्रेमात वाहून जाऊ नका. शुभ रंग जांभळा शुभ अंक  १

COMMENTS