Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चक्क एकाच बाईकवरून 7 जणांचा प्रवास

भयानक व्हिडीओ व्हायरल

भारतीय लोकांचा जुगाडमध्ये कोणीही हात पकडू शकत नाही. सध्या सोशल मीडियावर समोर आलेला व्हिडीओ देखील असाच आहे. जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. बाईकव

पाकिस्तानने मध्यरात्री केली संसद बरखास्त
5 वर्षांच्या चिमुरडीवर 28 वर्षीय तरुणाने केला अत्याचार | LOKNews24
काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी

भारतीय लोकांचा जुगाडमध्ये कोणीही हात पकडू शकत नाही. सध्या सोशल मीडियावर समोर आलेला व्हिडीओ देखील असाच आहे. जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. बाईकवर नियमांनुसार फक्त दोनच लोक प्रवास करु शकतात. जास्तीत जास्त 3 लोक प्रवास करू शकतात. परंतु या व्हिडीओमध्ये एका बाईकवर चक्कं 7 लोक बसले आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह कुठेतरी जाण्याच्या तयारीत आहे. तो स्वत: दुचाकीसोबत उभा असून खाली २ महिला आणि त्यांच्यासोबत ४ मुले आहेत. एकूण 7 जण एकाच बाईकवर बसतात आणि निघून जातात. सध्या हा व्हिडिओ व्हायरल झाला असून अनेकांनी अशा लोकांवर कारवाई  करण्याची मागणी केली आहे.

COMMENTS