आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र.

Homeताज्या बातम्यालाईफस्टाईल

आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र.

आज १९ ऑगस्ट

मेष:- वृषभ:- मिथुन:- कर्क:- सिंह:- कन्या:- तूळ:- वृश्चिक:- धनू:- मकर:- कुंभ:- मीन:-

आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र
आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र
आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र

मेष:-

डोळ्यावर पट्टी बांधून विश्वास ठेऊ नका. जुने ताण संपतील. वरिष्ठ नाराज होण्याची शक्यता आहे. दांपत्य जीवनातील मधुरता वाढेल. दिवस बर्‍यापैकी अनुकूल राहील.शुभ रंग लाल   
शुभ अंक ३

वृषभ:-

वाढीव कामातून लाभ मिळेल. कामात युक्ति वापरावी लागेल. आजच दिवस व्यस्त राहील. नोकरदारांनी बदलांकडे लक्ष ठेवावे. जवळच्या व्यक्तीच्या मदतीचा लाभ होईल.शुभ  रंग जांभळा  
शुभ अंक  ६

मिथुन:-

तांत्रिक कामात यश येईल. कामे जलद गतीने पार पडतील. अडकलेली कामे मार्गी लागतील. अधिकारी व्यक्तींच्या संपर्कात याल. दिवसाची सुरुवात उत्तम होईल.शुभ रंग नारंगी 
शुभ अंक ९

कर्क:-

गरज लक्षात घेऊन काम करावे. घाईने निर्णय घेऊ नका. मेहनतीला मागे हटू नका. आत्ममग्न राहाल. वरिष्ठांची नाराजी लक्षात घ्या.शुभ रंग पिवळा  
शुभ अंक ७

सिंह:-

हिशोबाच्या बाबतीत चोख राहावे. चुकीच्या सवयींपासून दूर राहावे. मोहाला बळी पडू नका. अनावश्यक चिंतेला दूर सारावे. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल.शुभ रंग हिरवा  
शुभ अंक ४

कन्या:-

एकमेकात तुलना करू नका. मुलांशी हितगुज कराल. घरात छोटासा धार्मिक कार्यक्रम कराल. रागावर नियंत्रण ठेवावे. अधिकारी व्यक्तींचे सहकार्य मिळेल.शुभ रंग पांढरा   
शुभ अंक १

तूळ:-

साहसी कामे करतांना सावध राहावे. पोटाची तक्रार जाणवेल. कामानिमित्त प्रवास घडेल. दिवस धावपळीत जाईल. समस्यांचे निराकरण न झाल्याने मन खट्टू होईल.शुभ रंग पोपटी   
शुभ अंक ८

वृश्चिक:-

योग्य मार्गदर्शनाचा लाभ घ्या. मनातील नकार काढून टाका. भांडकुदळ व्यक्तींपासून दूर राहावे. मुलांचा विरोध जाणवू शकतो. वडीलधार्‍यांचा सल्ला घ्यावा.शुभ रंग विटकरी 
 शुभ अंक ५

धनू:-

कामाचा ताण हलका होईल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. बदलातून काही अपेक्षित मार्ग सापडेल. नवीन संपर्क लाभदायक ठरतील. जुनी येणी वसूल होतील. शुभ रंग गुलाबी  
शुभ अंक २

मकर:-

त्वचा विकारांकडे लक्ष ठेवा. अति भावनिक होऊ नका. योग्य संधीची वाट पहावी. खर्च वाढू शकतो. प्रवासात निष्काळजीपणा करू नका.शुभ रंग निळा  
शुभ अंक ४

कुंभ:-

शा‍ब्दिक चकमक टाळावी. कौटुंबिक गोष्टींकडे अधिक लक्ष द्या. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. प्रेमातील जवळीकीत सावध रहा. मनातील इच्छा पूर्ण होईल.शुभ  रंग जांभळा  
शुभ अंक  ६

मीन:-

दुरावलेल्या लोकांना जवळ आणण्याचा प्रयत्न करावा. मुद्दलावर ध्यान द्यायला हवे. मुलांचे प्रश्न मार्गी लावाल. यशाने उत्साह वाढीस लागेल. उत्तम संधीने मन प्रसन्न होईल.शुभ रंग काळा  
शुभ अंक ८


COMMENTS