बेकायदेशीरपणे एसटी बस चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेकायदेशीरपणे एसटी बस चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा.

जयंत पाटील यांना एस टी बस चालवणे महागात पडणार

सांगली प्रतिनिधी- सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे तहसील कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ध्वजारोहण करण्यासाठी आलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष

राष्ट्रवादीच्या संभाव्य विलीनीकरणारचा तपशील उघड !
सरकार गेलेले सुतक आजही जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर; पडळकरांची टीका
लोकसभा निवडणुकीसाठी मविआच्या फॉर्म्युल्याबाबत जयंत पाटील यांनी दिली माहिती

सांगली प्रतिनिधी- सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे तहसील कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ध्वजारोहण करण्यासाठी आलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर आगाराची चक्क एस टी बस चालवली. यावेळी उपस्थित सगळेच अचंबित झाले. यावेळी सर्व प्रवाशांनी एस टी बस मध्ये बसून याचा आनंद घेतला. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याना एस टी बस चालवणे महागात पडणार आहे. कारण बेकायदेशीरपणे एस टी बस चालवल्याप्रकरणी आमदार जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा या बाबत भाजपाच्या नेत्यांनी इस्लामपूर पोलिसात तक्रार दिली आहे. एसटी चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना, किंवा जड वाहन चालक म्हणून आवश्यक असणाऱ्या परवाना किंवा, बॅच बिल्ला नसताना जड वाहन बेकायदेशीरित्या जयंत पाटील यांनी चालवले असा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

COMMENTS