चोपड्यात प्रेम संबंधातून दोघांची हत्या.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चोपड्यात प्रेम संबंधातून दोघांची हत्या.

हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना घेतले ताब्यात

जळगाव प्रतिनिधी- जळगाव(Jalgaon) दुहेरी हत्याकांडाने  हादरले आहे. जळगावच्या चोपडामध्ये एका मुलाला गोळी मारुन ठार मारण्यात आलं. तर मुलीची गळा दाबून हत

एकलहरे दरोड्यात पत्नीनेच केला पतीची गळा आवळून खून
व्हिडिओ काढत असल्याचा संशयावरून सिमेंट ब्लॉक डोक्यात मारून खून 
झोपेतच पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने स्वतःलाही संपवलं

जळगाव प्रतिनिधी- जळगाव(Jalgaon) दुहेरी हत्याकांडाने  हादरले आहे. जळगावच्या चोपडामध्ये एका मुलाला गोळी मारुन ठार मारण्यात आलं. तर मुलीची गळा दाबून हत्या करण्यात आली. प्रेमप्रकरणातून  दुहेरी हत्याकांडाचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चोपडा शहराजवळ असलेल्या जुना वराड शिवारात दोघांचे मृतदेह आढळून आल्यानंतर हे धक्कादायक प्रकरण समोर आलं. राकेश संजय राजपूत(Rakesh Sanjay Rajput) असं गोळी घालून हत्या कऱण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे, तर वर्षा समाधान कोळी असं मुलीचं नाव आहे. या हत्याकांड प्रकरणी पोलिसांना दोघा संशयितांना ताब्यात घेतले. तर इतर दोन संशयित आरोपींचा शोध सुरु आहे,असे एडिशनल एसपी चाळीसगाव विभाग रमेश चोपडे यांनी सांगितले.

COMMENTS