नवी दिल्लीः - देशाच्या राजधानीतून स्वातंत्र्यदिन दोन दिवसावर आला असतानाच दिल्लीतून 2 हजार जिवंत काडतूस पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. काडतुसांच्या दोन
नवी दिल्लीः – देशाच्या राजधानीतून स्वातंत्र्यदिन दोन दिवसावर आला असतानाच दिल्लीतून 2 हजार जिवंत काडतूस पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. काडतुसांच्या दोन बॅगांसह 6 आरोपींनाही ताब्यात अटक करण्यात आले आहे. आनंद विहार(Anand Vihar) परिसरातून काडतुसांच्या दोन बॅगा आणि दोन पुरवठा करणाऱ्या दोघांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली पोलिसांकडून आता कसून चौकशी करण्यात येत असून ही 2 हजार जिवंत काडतूसं कोणाला आणि दिल्लीतील कोणत्या भागात पुरवण्यात येत होती त्याची चौकशी आता सुरू करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी या जिवंत काडतूस घेऊन फिरणाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर आता 15 ऑगस्टच्या निमित्ताने हाय अलर्ट जाहीर केला आहे.
COMMENTS