स्थावर मिळकतीच्या खरेदीपत्राच्या दस्तऐवजांवर शासनाने 31 मार्च 2021 पर्यंत मुद्रांक शुल्कामध्ये सवलत जाहीर केली असल्याने या संधीचा लाभ घेण्यासाठी सातारा जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी होण्याची शक्यता आहे.
मालमत्ताधारकांनी कार्यालयात गर्दी करु नये : खांडेकर
सातारा / प्रतिनिधी : स्थावर मिळकतीच्या खरेदीपत्राच्या दस्तऐवजांवर शासनाने 31 मार्च 2021 पर्यंत मुद्रांक शुल्कामध्ये सवलत जाहीर केली असल्याने या संधीचा लाभ घेण्यासाठी सातारा जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी होण्याची शक्यता आहे. मुद्रांक शुल्क भरलेले दस्त नोंदणी अधिनियमानुसार दस्ताचे मुद्रांक शुल्क भरल्याच्या दिनांकापासून चार महिन्यांत नोंदणी केल्यास सवलत मिळणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी करु नये, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी बी. के. खांडेकर यांनी केले आहे.
महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन मुंबई यांचे 29 ऑगस्ट 2020 रोजीच्या शासन राजपत्रानुसार कोणत्याती स्थावर मिळकतीच्या अभिहस्तांतरणपत्र किंवा विक्रीपत्राच्या तसेच 29 वर्षापेक्षा जास्त कालावधीचे भाडेपट्टा या दस्तऐवजांवर उक्त अधिनियमास जोडलेल्या 1 च्या अनुच्छेद 25 च्या खंड (बी) व 36 (र्ळीं) अन्वये अधिभारासह आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क 1 सप्टेंबर 2020 पासून सुरु होणार्या आणि दि. 31 डिसेंबर 2020 रोजी संपणार्या कालावधीकरिता तीन टक्के तर दि. 1 जानेवारी 2021 पासून सुरु होणार्या 31 मार्च 2021 रोजी संपणार्या कालावधीत दोन टक्के कमी केले आहे, असेही मुद्रांक जिल्हाधिकारी बी. के. खांडेकर यांनी कळविले आहे.
COMMENTS