अहमदनगर क्लबवर एकता पॅनलचे वर्चस्व ; सचिवपदी नरेंद्र फिरोदिया

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर क्लबवर एकता पॅनलचे वर्चस्व ; सचिवपदी नरेंद्र फिरोदिया

अहमदनगर/प्रतिनिधी : नगरमधील प्रतिष्ठित व उच्चभ्रू नागरिक सभासद असलेल्या अहमदनगर क्लबच्या निवडणुकीमध्ये उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या नेतृत्वाखालील

रस्त्यावर भांडणे करू नका म्हटल्याच्या रागातून विनयभंग
लोणी-नांदूर शिंगोटे हायवेवर मालवाहतूक पिकअपचा भीषण अपघात.
कोपरगावमध्ये अवैध वाळू उपसाप्रकरणी गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी : नगरमधील प्रतिष्ठित व उच्चभ्रू नागरिक सभासद असलेल्या अहमदनगर क्लबच्या निवडणुकीमध्ये उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या नेतृत्वाखालील एकता पॅनलने 11 पैकी 10 जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. सचिवपदी नरेंद्र फिरोदिया 971 विक्रमी मते मिळवून विजयी झाले तर संचालकपदी पवन गांधी यांनी 894 एवढी सर्वात जास्त मत मिळवली. एकता पॅनलचे विजयी उमेदवार व मिळालेली मते अशी चेतन बोगावत (865), हेमंद्र कासवा (852), सुमतीलाल कोठारी(818), प्रवीण कटारिया (793), अशोक पितळे (771), जयवंत भापकर (698), सत्येन गुंदेचा (698), नीळकंठ अमरापूरकर (682), अजेश धुप्पड (654). दरम्यान, या निवडणुकीत एकता पॅनेलचे डॉ. अनिल बेंद्रे यांचा पराभव झाला व विरोधी प्रगती पॅनेलचे निलेश चोपडा विजयी झाले आहेत.
एकता पॅनलच्या सर्व उमेदवारांनी जल्लोष करीत विजय साजरा केला. यावेळी नरेंद्र फिरोदिया म्हणाले, ऐतिहासिक पार्श्‍वभूमी असलेला नगर क्लब शहराचे वैभव आहे. क्लबच्या सर्वांगीण विकासासाठी नूतन संचालक मंडळ कटीबद्ध आहे. सभासदांनी टाकलेला विश्‍वास सार्थ ठरवत काम करणार आहे. स्पोर्ट क्लब अद्ययावत करून भविष्यात येथे राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करू. तसेच सर्व सभासदांना आधुनिक सुविधा देवू, असे ते म्हणाले.

COMMENTS