केडगावमध्ये शरद पवारला तिघांची शिवीगाळ व मारहाण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केडगावमध्ये शरद पवारला तिघांची शिवीगाळ व मारहाण

अहमदनगर/प्रतिनिधी : मागील भांडणाचा मनात राग धरून तिघांनी शिवीगाळ व दमदाटी करीत लाकडी दांडके व काहीतरी टणक वस्तूने मारहाण करून शरद चंदु पवार (वय 23 वर

शेवगाव तालुक्यातील सहकारी सूतगिरणीस अर्थसहाय्य
पावसाअभावी शेतकरी हतबल
शारदा ज्युनिअर कॉलेजचा निकाल 87.18%

अहमदनगर/प्रतिनिधी : मागील भांडणाचा मनात राग धरून तिघांनी शिवीगाळ व दमदाटी करीत लाकडी दांडके व काहीतरी टणक वस्तूने मारहाण करून शरद चंदु पवार (वय 23 वर्षे, रा. मतकर मळा, केडगाव, नगर) याला जखमी केले. ही घटना नगर-पुणे रोडवरील केडगाव परिसरातील मतकर मळा येथे घडली.शरद चंदु पवार यांचे सुनील अजय चव्हाण, गणेश अर्जुन चव्हाण, अनिल अर्जुन चव्हाण (सर्व रा.आष्टी, जि.बीड) हे पाहुणे आहेत. सुमारे एक महिन्यापूर्वी सुनील चव्हाण व पवार यांचे घरगुती वाद झाले होते, परंतु पवार यांनी पोलिसांकडे तक्रार दिली नव्हती. सोमवारी (दि.13 ) रोजी रात्री 7.45 वाजता पवार हे त्यांच्या घरी असताना सुनील चव्हाण, गणेश अर्जुन चव्हाण, अनिल अर्जुन चव्हाण तेथे आले. त्यावेळी चव्हाण याने घरगुती वादाचा राग मनात धरुन पवार यांना काहीएक न बोलता लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. गणेश चव्हाण याने पवार यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करुन दुखापत केली. पवार त्यांना प्रतिकार करु लागले असता सुनील चव्हाण याने त्यांच्या डाव्या कानाचा चावा घेतला. तेवढयात अनिल चव्हाण याने त्याच्याकडील काहीतरी टणक वस्तूने त्यांच्या डोक्यात मारले. त्यावेळी पवार यांची आई सीताबाई चंदु पवार ही भांडण सोडविण्यासाठी आली असता तिलाही त्यांनी ढकलून दिले आणि त्यांनी पवार जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी शरद पवार यांनी तिघांविरुध्द् दिलेल्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार बी. एम. इखे करीत आहे.

COMMENTS