Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; लिपिक जाळ्यात

सांगली / प्रतिनिधी : शेतजमीन क्षेत्रावर असलेल्या तबदिलीस मनाई हा शेरा कमी करुन देण्यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागातील वरिष्ठ

गुरुजींच्या डमीला हद्दपार करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील शाळांमध्ये गुरूजींचे फोटो
जावलीचे जवान प्रथमेश पवार यांना विरमरण
एसटीच्या कर्मचार्‍यांच्या संपाला गालबोट; सुर्ली घाटात आटपाडी-कराड बसवर दगडफेक

सांगली / प्रतिनिधी : शेतजमीन क्षेत्रावर असलेल्या तबदिलीस मनाई हा शेरा कमी करुन देण्यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागातील वरिष्ठ लिपिकास 5 हजारांची लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज (दि. 31) केली. चारूदत्त शंकरराव गावडे (वय 57, रा. हुजर कॉम्पलेक्स पाठीमागे, भिवघाट रोड, तासगाव, जि. सांगली) असे लिपिकाचे नाव आहे.
तक्रारदार यांचे शेतजमीन क्षेत्रावर असलेल्या तबदिलीस मनाई हा शेरा कमी करुन देण्याकरीता गावडे यांनी तक्रारदारांकडे 5 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबतची तक्रार तक्रारदाराने सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानंतर गावडे यांना ताब्यात घेण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भुसंपादन क्र. 6) जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा लावला होता. यावेळी गावडे यांना तक्रारदार यांच्याकडून 5 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे पोलीस उपआयुक्त राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, पोलीस अंमलदार धनंजय खाडे, प्रितम चौगुले, अविनाश सागर, भास्कर भोरे, सलिम मकानदार, सीमा माने, चालक बाळासाहेब पवार यांनी केली.

COMMENTS