Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किल्ले अजिंक्यतारा येथे शाहु महाराज राज्यभिषेक दिन साजरा

सातारा / प्रतिनिधी : थंड हवेच्या गारठ्यात भल्या पहाटेच्या वातावरणात छत्रपती शाहू महाराजांचा जयघोषात, तुतार्‍यांच्या निनादात, सनईचा मंजूळ स्वर, हल

सातारा वैद्यकीय महाविद्यालय वर्षभरात सुरु होण्याचा मार्ग मोकळा; प्रतिवर्षी 100 विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश
लोणंद नगरपंचायतीसाठी 19 जण रिंगणात; पाच अपक्षांची माघार
आक्षेपार्ह भाषण केल्याबद्दल भाजपच्या नेत्यावर गुन्हा दाखल

सातारा / प्रतिनिधी : थंड हवेच्या गारठ्यात भल्या पहाटेच्या वातावरणात छत्रपती शाहू महाराजांचा जयघोषात, तुतार्‍यांच्या निनादात, सनईचा मंजूळ स्वर, हलगीच्या वादनाने किल्ले अजिंक्यतार्‍यावरील राजसदरेवर वातावरण शिवभय झाले होते. निमित्त होते छत्रपती शाहु महाराजांच्या राज्यभिषेक दिन सोहळ्याचे शिवभक्त, शाहुभक्तांनी किल्याच्या प्रवेशद्वारापासून छत्रपती शाहु महाराजांची 10 वर्षापूर्वी ठरवल्याप्रमाणे पालखी जयघोषात फुलांच्या वर्षावात गडावरील देवतांचे दर्शन घेवून राजसदरेवर जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात आसमंत दणाणून सोडत विसावली. सन 2032 मध्ये चांदीच्या पालखीत सोन्याची छ. शाहु महाराजांच्या मूर्तीसह पालखी सोहळा करण्याचा संकल्प या दिनी करण्यात आला.
गेली 12 वर्षांपासून शिवराज्यभिषेक दिन उत्सव समिती राजधानी सातारा यांच्यावतीने छत्रपती शाहु महाराजांचा राज्यभिषेक सोहळा किल्ले अजिंक्यतार्‍यावर साजरा करण्यात येतो आहे. याही वर्षी प्रथेप्रमाणे उत्साही वातावरणात शाहु महाराजांचा राज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सह्याद्री प्रतिष्ठानचे श्रमिक गोजममुंडे, कन्हैय्यालाल राजपुरोहित, संतोष शेडगे, दत्ताजी भोसले, नगरसेवक शेखर मोरे-पाटील, संग्राम बर्गे, शिवराज्यभिषेक उत्सव समितीचे दीपक प्रभावळकर, सुदाम गायकवाड, महेश पाटील, शरद पवार, वक्ते निलेश झोरे, सचिन जगताप, अ‍ॅड. विनीत पाटील, विश्‍वास मोरे, महेश गायकवाड, अ‍ॅड. अरविंद कदम, मंगेश काशिद, रवी पवार, प्रकाश घुले, गणेश दुबळे, संतोष लोहार, राजवी हलगेकर, मनीषा फरांदे, उर्मिला भोजने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कुडकुडत्या थंडीत छत्रपती शिवाजी महाराज कि जयचा जयघोष करत शिवभक्त व शाहु भक्तांनी भल्या पहाटे गड गाठला. गडाच्या पायथ्याला सगळ्या शिवभक्तांनी छत्रपती शाहु महाराजांच्या पालखीला प्रारंभ केला. पालखी भराभर मावळ्यांनी गडाच्या पायर्‍या चढवत नेली. गडावरील देवतांचे दर्शन घेवून राजसदरेवर छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शाहु महाराज की जय अशा घोषणा देत विसावली. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहु महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करुन राज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला.
शिवराज्यभिषेक उत्सव समितीने किल्ले अजिंक्यतार्‍यावर सन 2032 मध्ये छत्रपती शाहु महाराजांचा स्वराज्यभिषेक दिन चांदीच्या पालखीत व सोन्याच्या मूर्तीसह साजरा करण्याचा संकल्प केला. हा विचार ऐकताच शिवरायांचे थेट तेरावे वंशज खासदार उदयनराजे यांनी हा संकल्प ऐकताच त्यांनी लगेच समितीला 1 किलो चांदी अर्पण केली. या संकल्पात शिवराज्यभिषेक उत्सव समितीतर्फे पाठीशी आम्ही खंबीर उभे असल्याचे त्यांच्यातर्फे सांगण्यात आले. राजसदरेवर घोषणा झाली त्यावेळी जयघोषात आणि टाळ्यांच्या कडकाडाटात त्याचे स्वागत झाले.
किल्ल्यावर पालखी पोहचताच मंगळाईच्या दर्शनानंतर आज राजमाता जिजाऊ जयंती असल्याने उपस्थित महिला भगिनींनी छत्रपती शाहु महाराजांच्या पालखीला खांदा दिला. पालखीवर पुष्पवृष्टी करत शिवाजी महाराज की जयघोष म्हणत पुढे तुतार्‍यांच्या निनाद, हलगीचा आवाजात वातावरण बदलून गेले होते.
इतिहासामध्ये पालखीला एक मोठे महत्व आहे. पालखीचा सोहळा शाहु महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने काढण्यात आला होता. सोहळ्यात पालखीचा मान मुस्लिम बांधवांना देण्यात आला. अगदी मंदिरापर्यंत त्यांना हा सन्मान देण्यात आला होता.
मोरे-पाटील अन् जगताप घराण्याने जपली परंपरा
गोडोली गावचे मानकरी म्हणून मोरे-पाटील यांची ओळख आहे. गोडोलीच्या देवाचे मानकरी शेखर मोरे-पाटील हे दरवर्षी न चुकता या सोहळ्याला हजेरी लावतात. तसेच गोडोलीतील जगताप घराणेही या सोहळ्याला हजेरी लावतात. मोरे-पाटील आणि जगताप घराण्याने याहीवर्षी आपली परंपरा जपली आहे.

COMMENTS