Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर ‘किसन वीर’ कारखान्याच्या गव्हाणीत पडली मोळी

भुईंज / वार्ताहर : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना सुरू होणार नाही. या चर्चांना फोल ठरवत अखेर गुढीपाडव्याला कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला.

पाण्यासाठी वडूजमध्ये नागरिकांचा रास्ता रोको; आठ दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस देशपातळीवरील 4 सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार
शेतमालावरील वायदे बाजार बंदी तातडीने हटवावी…स्वतंत्र भारत पक्षाचा सत्याग्रह इशारा

भुईंज / वार्ताहर : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना सुरू होणार नाही. या चर्चांना फोल ठरवत अखेर गुढीपाडव्याला कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला. प्रत्येक ठिकाणी अडवणूक होऊनही सर्व संकटांवर मात करत किसन वीरच्या गव्हाणीत मोळी पडली. हंगाम यशस्वी करण्याचा निर्धार विद्यमान संचालक मंडळाने केला.
कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले म्हणाले, आज गुढीपाडवा आहे. त्यामुळे कोणी कोणी काय-काय उद्योग करून हा हंगाम सुरू होऊ, नये यासाठी प्रयत्न केले याबाबत बोलणार नाही. ते बोलण्याचा आजचा दिवस नाही. मात्र, पुराव्यांनिशी, कागदांनिशी योग्य ठिकाणी बोलेन. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सहकार्य केले आणि हंगाम सुरू करता आला. मात्र, त्यांच्याकडून मदत होऊ नये, यासाठी प्रयत्न केले गेेले. मी जबाबदारीपासून पळून जाणारा नाही.
सभासदांची एफआरपी असो, कामगारांचे प्रश्‍न असो की कारखान्याबाबतचे इतर काही विषय असोत त्याची जबाबदारी माझी आहे. ती मी अखेरपर्यंत पार पाडण्याचा प्रयत्न करणार. शेतकर्‍यांना किती आणि काय काय सोसावे लागले, कामगारांना किती अडचणीतून जावे लागले, याची जाणीव मला आहे. आम्हा सर्वांना जे भोगावे लागले त्यातून काहींना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. गेली वर्षभर हंगाम सुरु होण्यासाठी धावपळ सुरु होती. सभासद शेतकर्‍यांच्या हितासाठी जिथे-जिथे आवश्यकता होती तिथे-तिथे गेलो. तिथे कमीपणा मानला नाही.
शेवटी ही शेतकरी सभासदांच्या मालकीची संस्था आहे ती टिकली पाहिजे हाच विचार केला. मी जर खचलो तर या संस्थेचा गळा घोटण्यास चोवीस तासही लागणार नाहीत ही भीती असल्याने जिद्दीने पाय रोवून उभा राहिलो. त्यामुळेच आज हा गोड दिवस उशीरा का होईना उगवला. अनेक शेतकरी किसन वीरलाच ऊस घालणार या भूमिकेवर ठाम आहेत. निवडणुकीच्या काळात जे बोलायचे ते बोलेनेच पण डोंगर पायथ्याचा असो की खाचरातील असो सर्व उसाचे गाळप करण्यासोबत सर्व अडचणींवर आपल्या सर्वांच्या सहकार्याने मात करण्याचा प्राणप्रणाने प्रयत्न करेन, अशी ग्वाही मदन भोसले यांनी दिली.
यावेळी संचालक सीए सी. व्ही. काळे, चंद्रकांत इंगवले, रतनसिंह शिंदे, नंदकुमार निकम, सचिन साळुंखे, प्रविण जगताप, प्रताप यादव-देशमुख, नवनाथ केंजळे, मधुकर शिंदे, सयाजी पिसाळ, चंद्रसेन शिंदे, प्रकाश पवार-पाटील, मधुकर नलवडे, विजय चव्हाण, अरविंद कोरडे, प्रभारी कार्यकारी संचालक अशोक शिंदे, डॉ. दत्तात्रय फाळके, जयवंत साबळे, शंकरराव पवार, शेखर भोसले-पाटील, संतोष जमदाडे, अमर करंजे, सुरेश पवार, विठ्ठल इथापे, आनंद जाधवराव, केशव पिसाळ, सुरेश चिकणे, अविनाश सावंत आदी उपस्थित होते. हणमंतराव निकम यांनी सूत्रसंचालन केले तर संचालक नंदकुमार निकम यांनी आभार मानले.

COMMENTS