Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मांत्रिकांच्या माध्यमातून मेळघाटातील बालमृत्यू व माता मृत्यू कमी होईल-आरोग्य विभागाचा दावा

अमरावती प्रतिनिधी - अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात बालमृत्यू, मातामृत्यू अशा अनेक आरोग्याच्या समस्या गेल्या अनेक वर्षापासून कायम आहे,अशिक्षित अ

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेवर वाढली अतिक्रमणे
BREAKING: महाराष्ट्र सरकार ने जाहीर केलं Weekend Lockdown | What Is Weekend Lockdown? | LokNews24
रिंकू सिंहच्या शॉटने खळ्ळ खट्याक प्रचंड ताकदीनं मारलेल्या सिक्सने फोडली काच

अमरावती प्रतिनिधी – अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात बालमृत्यू, मातामृत्यू अशा अनेक आरोग्याच्या समस्या गेल्या अनेक वर्षापासून कायम आहे,अशिक्षित असलेले अधिक आदिवासी डॉक्टर कडे जाऊन उपचार घेत नाही त्यामुळे मेळघाटातील 600 च्यावर मांत्रिकांना आजपासून गोळा करून मांत्रिकानां आरोग्य विभाग प्रशिक्षण देणार आहे व त्यांना मानधन म्हणून 100 रुपये देखील देणार आहे, आदिवासी बांधवांनी रुग्णालयात येऊन उपचार घ्यावा, यासाठी आता मांत्रिकच (भूमका) प्रशासनाला मदत करणार आहे.त्यासाठी प्रशासन मांत्रिकाच्या दारी पोहोचल. त्या मांत्रिकाने रुग्णांना रुग्णालयात रेफर करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन आरोग्य विभागाने केलं आहे, तर भूमिका च्या माध्यमातून मेळघाटातील बालमृत्यू, माता मृत्यू व आरोग्याच्या समस्या निकाली काढण्यात काही प्रमाणात यश मिळेल असा दावा आरोग्य विभागाने केला आहे, मात्र कोट्यावधी रुपये खर्च करून आरोग्य यंत्रणा ही अपयश का आलं कारण त्यांना मांत्रिकाची मदत घ्यावी लागते हा चिंतेचा विषय आहे, भूमिकाला प्रशिक्षण देणाऱ्या निर्णयाचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हरीश केदार यांनी स्वागत केले पण इतकी वर्षे होईनही आरोग्य यंत्रणा का अपयशी ठरली हा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे

COMMENTS