HomeUncategorized

रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई पाटील यांची आज पुण्यतिथी

सातारा / प्रतिनिधी : पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नी, रयत माउली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील उर्फ सौ. वहिनी यांची 92 वी पुण्यतिथी

शासकिय आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती बंधनकारक
नांदेडमध्ये शहर वाहतूक शाखेची धडक मोहीम : 9 दिवसांत 21 लाखांहून अधिक दंड; शिस्तबद्ध वाहतुकीसाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक
भाजप पक्षात घराणेशाहीला स्थान नाही : निशिकांत भोसले-पाटील

सातारा / प्रतिनिधी : पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नी, रयत माउली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील उर्फ सौ. वहिनी यांची 92 वी पुण्यतिथी कार्यक्रम शुक्रवार, दि. 1 एप्रिल 2022 रोजी दुपारी 2 वाजता यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे. या पुण्यतिथी कार्यक्रम हा रयत शिक्षण संस्थेच्या सातारा शहरातील सर्व स्थानिक शाखांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून अनगोळ फौंडेशनच्या सचिव दलितमित्र प्रा. साधना झाडबुके या उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे कार्यकर्ते, सातारा शहरातील शिक्षणप्रेमी नागरिकानी उपस्थित रहावे, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. व्ही. एस. शिवणकर यांनी केले आहे.

COMMENTS