Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिंपरी, चिंचवडचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद

रावेतच्या जलउपसा केंद्रात दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.

प्रदीप शर्मांना 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी
लिफ्टमध्ये अडकून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू
’डेमोक्रेटिक आझाद पार्टी’ गुलाम नबी आझादांचा नवा पक्ष

पुणे/प्रतिनिधीः रावेतच्या जलउपसा केंद्रात दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या गुरुवारी (1 एप्रिल) पिंपरी-चिंचवडच्या संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. तसेच शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठाही विस्कळीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून करण्यात आले आहे. 

पिंपरी चिंचवड महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीच्या काम करण्यात येणार आहे. यासाठी उद्या (1 एप्रिल) गुरुवारी पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी पाणीपुरवठा झाल्यानंतर हे दुरुस्ती काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे शहरात होणार सायंकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. तसेच शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. मावळ तालुक्यातील पवना धरणामधून पिंपरी चिंचवडकरांना पाणीपुरवठा केला जातो. रावेत येथील बंधाऱ्यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करून शहरवासीयांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युतविषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणे, सेक्टर क्र. 23 निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्र विद्युत पुरवठा विषयक आणि पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे करणे, शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक आहे. त्यासाठी गुरुवारी शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत गुरुवारी सकाळी पाणीपुरवठा केला जाईल; पण त्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठ्याची सर्व यंत्रणा बंद ठेवली जाणार आहे. पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भागात दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

COMMENTS