व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशाची मागणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशाची मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी : अहमदनगर शहरातील उपनगरात राहणार्‍या एका तरुणीला लग्नाचे आमीष दाखवून व तिच्यावर अत्याचार करून मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून वेळोवेळी पै

जवळा ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला
प्रल्हादाची उत्कट भक्ती आणि ध्रुवबाळाची अचल निष्ठा आजच्या तरुणांना प्रेरणादायी ठरावी : हभप पुरुषोत्तम कोळपकर
आ. जगतापांमुळे येऊ शकते लॉकडाऊनची नामुष्की ; काँग्रेसच्या काळेंनी केला नाव न घेता दावा

अहमदनगर/प्रतिनिधी : अहमदनगर शहरातील उपनगरात राहणार्‍या एका तरुणीला लग्नाचे आमीष दाखवून व तिच्यावर अत्याचार करून मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून वेळोवेळी पैशाची मागणी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार करणार्‍या गणेश शिंदे (रा. शिंदे मळा, बालिकाश्रमरोड, अहमदनगर) याच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणीची 13 वर्षांपूर्वी गणेशसोबत ओळख झाली. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. 10 महिन्यांपूर्वी गणेशने फिर्यादी तरुणीला त्याच्या घरी बोलावून लग्नाची मागणी घातली. त्या मागणीला तिनेे होकार दिला. तेव्हा गणेशने तिच्या इच्छेविरुद्ध संबंध केले व त्याचे मोबाइलमध्ये चित्रकरण केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडे पैशाची मागणी केली. तिने वेळोवेळी गणेशच्या वेगवेगळ्या मित्रांच्या फोन पे वर पैसे पाठविले. गणेशच्या दोन्ही दाजींनी तरुणीसोबत गणेशचे लग्न लावून देण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु, त्यांनी गणेश सोबत लग्न लावुन दिले नाही. गणेशने 20 फेब्रुवारी 2022 रोजी घरी बोलावून त्याचे दाजी घरी असतानाही संबंध ठेवले असल्याचे पीडित तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे.

COMMENTS