अटक न करण्यासाठी लाच घेणाराच झाला अटक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अटक न करण्यासाठी लाच घेणाराच झाला अटक

अहमदनगर/प्रतिनिधी : पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करणे व तपासात मदत करण्याकरिता वीस हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती सतरा हजार र

अत्याचार बाधितांच्या आठ वारसांना शासकीय नोकरी
मोहन गायकवाड यांनी केला शरणपूर वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा.
जीवघेण्या विषाणूचा भारतात आढळला आणखी एक रुग्ण

अहमदनगर/प्रतिनिधी : पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करणे व तपासात मदत करण्याकरिता वीस हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती सतरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी संजय काळे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
याबाबतची माहिती अशी की तक्रारदार यांचे चुलते आणि चुलतभाऊ यांच्याविरुद्ध श्रीगोंदा पोलिस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी यांना अटक न करणे व तपासामध्ये आरोपी यांच्या बाजूने मदत करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 20 हजारांची लाचेची मागणी करून तडजोडीअंती 17 हजार रुपयांची लाच स्वीकारताना श्रीगोंदा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या संजय बबन काळे यास अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. काळे याने 20 हजारांची मागणी केल्यावर तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीची शहानिशा करून पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. त्यानुसार 23 मार्च 2022 रोजी तडजोडीअंती 17 हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने काळेविरुद्ध श्रीगोंदा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करीत त्यास अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे, वाचक पोलीस उपअधीक्षक सतीश भांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरचे पोलिस उप अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग हरीश खेडकर, पोलिस नाईक रमेश चौधरी, विजय गंगुल, पोलिस अंमलदार वैभव पांढरे, रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, चालक पोलिस हवालदार हरुन शेख, राहुल डोळसे यांनी केली आहे. आरोपी काळे याच्याविरुद्ध यापूर्वीही 2017 मध्ये तोफखाना पोलिस स्टेशनला नेमणुकीस असताना लाचेचा यशस्वी सापळा कारवाई झालेली आहे. अटक न करण्यासाठी लाट घेणारा पोलिसच अटक झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

COMMENTS