खाऊन-पिऊन व पैसे घेऊन तोतया पोलिस झाले फरार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खाऊन-पिऊन व पैसे घेऊन तोतया पोलिस झाले फरार

अहमदनगर/प्रतिनिधी : तोतया पोलिसांकडून हॉटेल व्यावसायिकांना गंडा घालण्याचा प्रकार नगर तालुक्यात घडला आहे. नगर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील काही ह

सामाजिक सलोखा राखण्यासाठी आरोपींवर कारवाई करा ः संधान
शुक्राचार्य मंदिर सेवकांचा कामगार दिनी सन्मान
ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये झपाट्याने वाढ | पहा Lok News24

अहमदनगर/प्रतिनिधी : तोतया पोलिसांकडून हॉटेल व्यावसायिकांना गंडा घालण्याचा प्रकार नगर तालुक्यात घडला आहे. नगर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील काही हॉटेल चालकांना तोतया पोलिसांनी लुटल्याची घटना समोर आली आहे. मात्र, याबाबत तालुका पोलीस स्टेशनमध्ये कोणताही गुन्हा दाखल नाही. मिळालेल्या माहितीनुसार एका पांढर्‍या रंगाच्या स्कार्पिओमध्ये बसून आलेले काही लोक पोलिस असल्याचे सांगत हॉटेलमध्ये खाऊन-पिऊन व हॉटेल चालकाकडून काही रक्कम घेऊन पसार झाले आहेत. जेव्हा काही हॉटेल चालकांना याबाबत शंका आली व त्यानंतर त्यांनी चौकशी केली असता हे पोलीस तोतया असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मात्र, तोपर्यंत हे तोतया पोलीस खाऊन पिऊन फरार झाले होते. या प्रकाराची जोरदार चर्चा नगर तालुक्यातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये आहे.

COMMENTS