फसवणूक झाली, पण अर्ध्या तासात रक्कम मिळाली

Homeताज्या बातम्या

फसवणूक झाली, पण अर्ध्या तासात रक्कम मिळाली

अहमदनगर/प्रतिनिधी ः अलिकडच्या काळात ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे व अनेक मार्गाने फसवणूक केली जात आहे. अशीच फसवणूक मच्छिंद्र शेरकर (रा. अहमदनगर)

अहमदनगर यतीमखाना संस्थेतील माजी विद्यार्थी 30 वर्षानंतर आले एकत्र
प्रशिक्षकपदावरून गौतम गंभीरची सुट्टी होणार?
श्रीरामपूर तहसीलदारांची वाळू माफियांवर ‘सर्जिल स्ट्राईक’!

अहमदनगर/प्रतिनिधी ः अलिकडच्या काळात ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे व अनेक मार्गाने फसवणूक केली जात आहे. अशीच फसवणूक मच्छिंद्र शेरकर (रा. अहमदनगर) यांची झाली होती. मात्र, त्यांनी तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क केल्याने शेरकर (रा. अहमदनगर) यांचे गेलेले 49 हजार 700 रुपये अवघ्या अर्ध्या तासात परत मिळाले. एनीडेक्स अ‍ॅप डाऊनलोड केल्याने शेरकर यांच्या खात्यातून 49 हजार 700 रुपये काढून घेतले गेली. त्यांनी लगेच सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भोसले व पोलीस उपनिरीक्षक प्रतीक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अभिजित अरकल, राहुल गुंडू उमेश खेडकर, सविता खताळ यांनी तांत्रिक तपास करून शेरकर यांची फसवणूक झालेली रक्कम त्यांना परत मिळवून दिली. पैसे गेल्याने हवालदिल झालेल्या शेरकर यांच्या चेहर्‍यावर पैसे परत आल्याने हास्य फुलले.

COMMENTS