लखनौ : उत्तरप्रदेशात काँग्रेस, आणि बसपाला दोन नको संख्या गाठण्यात अपयश आले असून पुन्हा एकदा योगी सरकार सत्तेत येणार असल्याचे जवळपास स्पस्ट झाले आहे.
लखनौ : उत्तरप्रदेशात काँग्रेस, आणि बसपाला दोन नको संख्या गाठण्यात अपयश आले असून पुन्हा एकदा योगी सरकार सत्तेत येणार असल्याचे जवळपास स्पस्ट झाले आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी कडवी झुंज देऊनही भाजप सत्तेत वापसी करणार असल्याचे जवपास निश्चित झाले आहे. दुपारी १२ पर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपने उत्तर प्रदेशातील ४०३ जागापैंकी २७३ जागांवर आघाडी घेतली आहे. दुसरीकडे समाजवादी पक्ष ११९ जागांवर आघाडीवर आहे. मायावतींचा बसप ४ जागांवर, काँग्रेस ३ जागांवर आघाडीवर आहे. इतर ३ जागांवर आघाडीवर आहेत.
ज्या उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांना चिरडण्याची, तसेच हाथरस प्रकरण झाले त्या ठिकाणी सुद्धा भाजप उमेदवार आघाडीवर आहेत. गोरखपूर मतदारसंघातून योगी आघाडीवर आहेत, तर कथरालमधून अखिलेश यादव आघाडीवर आहेत.
योगी आदित्यनाथ (भाजप) गोरखपूर शहरातून तर अखिलेश यादव (एसपी) करहलमधून निवडणूक रिंगणात आहेत. कौशांबीच्या सिरथू मतदारसंघातून केशव प्रसाद मौर्य (भाजप) नशीब आजमावत आहेत.
COMMENTS