Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खंबाटकी घाटातील नव्या मार्गिका बोगदा कामाची पालकमंत्र्यांकडून पहाणी

सातारा / प्रतिनिधी : राज्यातील पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 (नवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48) वरील खंबाटकी घाटातील नव्या सहा मार्गि

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह माजी खा. राजु शेट्टी एकाच बँनरवर; राजकिय चर्चेला उधाण
भूलतज्ज्ञ संघटनेची देशव्यापी मशाल यात्रा बुधवारी कराडमध्ये येणार
राष्ट्रवादीचे कार्यालय काँग्रेस ताब्यात घेणार का?

सातारा / प्रतिनिधी : राज्यातील पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 (नवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48) वरील खंबाटकी घाटातील नव्या सहा मार्गिका बोगद्याच्या कामाची पहाणी सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली.
यावेळी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पुणे विभागीय प्रकल्प संचालक संजय कदम यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सातारा-पुणे महामार्गावर वाहतुकीच्या होणार्‍या कोंडीमुळे केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्या पुढाकाराने आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यावतीने खंबाटकी घाटातील नव्या सहा मार्गिका बोगद्याचे काम जलद गतीने सुरु आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई-पुणे-सातारा- कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक या मार्गिका बोगद्यामुळे सुरळीत होणार आहे. हा मार्ग जिल्ह्यातून जाणार असल्यामुळे सातारा जिल्हा व पश्‍चिम महाराष्ट्रासाठी उपयुक्त ठरणार आहे. सुरक्षतेला प्राधान्य देवून या बोगद्याचे काम सुरु आहे. या बोगद्यामुळे अंतर कमी होण्याबरोबर वेळेची, इंधनाची, पैशाच्या बचतीबरोबर अपघातांचे प्रमाण कमी होईल, असा विश्‍वास पालकमंत्री पाटील यांनी पहाणी दरम्यान व्यक्त केला.

COMMENTS