Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोनगाव परिसरात बिबट्याची दहशत सुरू; वनखात्याचे मात्र दुर्लक्ष

सातारा : बिबट्याने चावा घेऊन ठार केलेला कुत्रा. (छाया : अनिल वीर) सातारा : सोनगाव परिसरातून प्रवीण कदम यांच्या कोंबड्या बिबट्याने 2 वेळा पळविल्या

ओम्नी गाडीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; दोघे जखमी
शेतकर्‍यावर रानडुक्कराचा भिषण हल्ला; शेतकरी गंभीर जखमी
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कोषाध्यक्षपदी विनोद कुलकर्णी

सातारा : सोनगाव परिसरातून प्रवीण कदम यांच्या कोंबड्या बिबट्याने 2 वेळा पळविल्या होत्या. तेंव्हापासूनच त्याचा वावर अद्याप सुरू असून आता तर चक्त त्याने कुत्र्यावर मोर्चा वळवला आहे. शिवाय, अंधार पडला की, गाड्यांचा पाठलागही करत आहे. एवढी दहशत बिबट्याची वाढली असून वनखाते मात्र अक्षम्य असे दुर्लक्ष्य करत आहे.
बिबट्याने 2 पाळीव कुत्र्यावर हल्ला करून एकास ठार मारले तर दुसर्‍यास पळवुन नेले आहे. जवळच असणार्‍या शिवशाहीच्या ढाब्याचे मालक पृथ्वीराज जाधव हे दुचाकीवरून जाताना त्याने पाठलाग केला होता. अशी स्थिती चालू आहे. संपूर्ण परिसरात अंधार झाला की चिडीचूप होत आहे. पहाटे याच परिसरात कुरनेश्‍वर मॉर्निंग ग्रुप व इतर पादचार्‍यांची रेलचेल असते. त्यांनीही धसका घेतला आहे. ज्यावेळी प्रवीण कदम यांच्या कोंबड्या पळवल्या होत्या. तेंव्हापासून वनखाते उपाययोजना करणार असल्याच्या वल्गना करत आहे. मात्र,अद्याप कोणतीही कारवाई केली नाही.

COMMENTS