भय्यूजी महाराज आत्महत्याप्रकरणी दोषींना 6 वर्षाची शिक्षा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भय्यूजी महाराज आत्महत्याप्रकरणी दोषींना 6 वर्षाची शिक्षा

इंदौर : अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींना अखेर कोर्टाने सहा वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आ

मुख्यमंत्रिपदाची हाव नसल्याचा मेसेज
नेतृत्वाच्या वागण्यातील पोरकटपणा कार्यकर्त्यामध्ये आलाय  
लाल कांद्याच्या खरेदीसाठी हस्तक्षेप करा

इंदौर : अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींना अखेर कोर्टाने सहा वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यामध्ये प्रकरणात मुख्य सेवक विनायक, चालक शरद आणि शिष्य पलक यांना दोषी ठरविण्यात आले आहे. या तिघांनाही सहा सहा वर्षाची शिक्षा देण्यात आली आहे. या प्रकरणात आता तिघांना शिक्षा देण्यात आली असली तरी भय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर त्यांची मुलगी आणि त्यांची दुसरी पत्नी यांच्यातील वाद उफाळून आला होता.
भय्यू महाराज यांच्या नावाला एक वलय प्राप्त झाले होते. ते महाराज म्हणून नावारुपाला आल्यानंतर त्यांचा भक्तगणही मोठ्या प्रमाणात वाढला होता. सामान्य नागरिकांसह अनेक सेलिब्रेटीही त्यांचे भक्त होते. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येनंतर अनेकांना धक्का बसला होता. त्यानंतर त्यांची शिष्या आणि भय्यू महाराज यांच्या व्हॉटस्अप चॅट पोलिसांना तपासल्यानंतर धक्कादायक माहिती समोर येत गेली. त्यामुळे प्रत्येक तपासानंतर वेगवेगळी माहिती समोर येत गेली. भय्यू महाराज यांनी आपल्या मालकीची असलेली रिव्हॉलरने 2018 मध्ये गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केली होती. ज्या तिघांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे, त्यांनी भय्यू महाराज यांना आत्महत्या करण्यास कारणीभूत असल्याच्या कारणावरुन त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. भय्यू महाराज यांना शिक्षा झालेले आरोपी पैश्यासाठी त्रास देत होते. त्यामुळे न्यायालयाने पलक, शरद आणि विनय यांना आत्महत्यप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. यामधील पलक ही त्यांची शिष्या होती. तर विनायक सेवाकार आणि शरद हा त्यांचा खासगी चालक होता. इंदौरच्या भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी या तिघांना 2019 मध्ये त्यांना अटक केली होती.

COMMENTS