आता दुकानातच मिळणार वाईन ; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आता दुकानातच मिळणार वाईन ; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई : राज्यातल्या सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असून, तसा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र
Jalna : शिवसेनेत आग लावण्याचं काम माझं नाही – रावसाहेब दानवे | LOKNews24
हर घर नर्सरी हा उपक्रम प्रभावीपणे राबवा-जिल्हाधिकारी

मुंबई : राज्यातल्या सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असून, तसा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. हा प्रस्ताव आधी विचाराधीन होता. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
1000 चौरस फुटाच्या दुकानातच वाईन विक्री करता येणार आहे. याबद्दल बोलताना राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक म्हणाले, महाराष्ट्रात बर्‍याच वाईनरी असताना आता 1000 चौरस फुटांच्या छोट्या दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. शेतकर्‍यांच्या फळ उत्पादनावर वाईनरी चालते. त्यांना चालना देण्यासाठी वाईन विक्री करता येणार आहे. राज्यात नवी वाईन पॉलिसी राबवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. पुढच्या वर्षापर्यंत वाईन उद्योगाचा विस्तार 1 हजार कोटी लीटरपर्यंत वाढवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यादृष्टीने आता राज्य सरकारने पाऊले टाकायला सुरुवात केली आहे. सध्या राज्यात वाईनची दरवर्षी 70 लाख लिटरची विक्री होते. सरकारच्या या नव्या धोरणामुळं हा आकडा 1 हजार कोटी लिटरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र, त्या आधी राज्य सरकारनं वाईनवर प्रति लिटर 10 रुपयांचा अबकारी कर जाहीर केला आहे. त्यामुळे वाईन थोडी महाग होणार आहे. दुसरीकडे, अनेक बेकरी पदार्थांमध्ये वाईनचा उपयोग होत असतो. बहुतेक वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे वाईनचा वापर चवीसाठी केला जात असतो. त्यामुळे दैनंदिन किराणा दुकानात होणार्‍या वाईनची विक्री ही बीअरच्या धर्तीवर कॅनमधून करण्याची मागणी होत आहे. उत्पादन शुल्काने या आधीच आयात व्हिस्कीवरील शुल्क 300 टक्क्यांवरून 150 टक्क्यांवर आणले आहे.

आघाडी सरकार बेवडयांना समर्पित :मुनगंटीवार
राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्याच्या निर्णयावर भाजपने आक्षेप घेत जोरदार टीका केली. यापुढे एक पाऊल जात भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करताना हे पूर्णपणे बेवड्यांना समर्पित सरकार असल्याची टीका केली आहे. आज राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आलेल्या एका निर्णयाची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिल्यानंतर त्यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

COMMENTS