मालेगावमध्ये महापालिकेत काँगे्रसला खिंडार ; काँगे्रसच्या महापौरांसह 28 नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये प्रवेश

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मालेगावमध्ये महापालिकेत काँगे्रसला खिंडार ; काँगे्रसच्या महापौरांसह 28 नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये प्रवेश

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात असले तरी, राष्ट्रवादीच्या महत्वाकांक्षा वाढलेल्या असून, त्यांनी सत्तेत असलेल्या काँगे्रसल

समृद्धीवरील अपघातात दोन डॉक्टरासह 3 जणांचा मृत्यू
अमृतवाहिनीच्या एमबीएमधील विद्यार्थ्यांचे 100 टक्के प्लेसमेंट
Beed : माजलगाव धरण ओव्ह्यरफ्लो (Video)

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात असले तरी, राष्ट्रवादीच्या महत्वाकांक्षा वाढलेल्या असून, त्यांनी सत्तेत असलेल्या काँगे्रसलाच मालेगावमध्ये धोबीपछाड दिली आहे. मालेगाव महानगरपालिकेतील 28 नगरसेवकांनी काँगे्रसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे काँगे्रसची पुन्हा एकदा पीछेहाट होतांना दिसून येत आहे.
मालेगावमध्ये चक्क महापौरांसह काँग्रेसच्या 28 नगरसेवकांनी गुरूवारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईमध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. काँग्रेसला रामराम ठोकलेल्या नगरसेवकांमध्ये महापौर ताहिरा शेख यांचा देखील समावेश आहे. या पक्षप्रवेशाविषयी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या नगरसेवकांना त्यांचे प्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वासन दिले. दरम्यान, यावेळी बोलताना नुसती भाषणे करून प्रश्‍न सुटत नाहीत, असा टोला देखील अजित पवारांनी लगावला. नवाब मलिकांकडे असलेल्या विभागाच्या माध्यमातून राज्यातल्या तरुणांना उभे करण्याचे काम आपण करतो. आपल्या समाजात इतरांच्या तुलनेत शिक्षण कमी आहे. त्यावर कसे काम करता येईल, त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मौलाना आझाद मंडळाच्या माध्यमातून कशी मदत करता येईल, यासाठी काम केले जात आहे, असे अजित पवार म्हणाले. नाशिकचा विकास झाला, तसाच मालेगावच्या बाबतीत देखील समस्या सोडवण्याच्या दृष्टीने एकत्र बसून चर्चा करू. या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत येण्याचा घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे, हे तुम्हाला कामातून सिद्ध करून दाखवू, ही ग्वाही मी सर्व सहकार्यांना देऊ इच्छितो. अनेक प्रश्‍न निर्माण होणार आहेतच. पण त्यातून मार्ग काढण्याचं काम आपण करू, असे आश्‍वासन देखील पवार यांनी दिले.

COMMENTS