Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओबीसी आरक्षणात बलदंड लोक घुसले – मंत्री भुजबळ

गरज पडल्यास राजीनामा देण्याचा इशारा

मुंबई ः राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करून अधिसूचना काढल्यानंतर ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारच

चार हत्याकांडांनी नागपूर जिल्हा हादरला l Crime Show | Lo
दहीहंडीचा क्रीडा प्रकारात समावेश ; गोविंदांना शासकीय नोकरीमध्ये 5 टक्के आरक्षण
राज्यात यंदाचा उन्हाळा कडक

मुंबई ः राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करून अधिसूचना काढल्यानंतर ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारच्या मराठा आरक्षणासंबंधीच्या भूमिकेमुळे ओबीसींचे आरक्षण गेल्याचे सांगण्यात कोणतेही तत्वज्ञान मांडण्याची गरज नाही, आमच्या आरक्षणात आता बलदंड लोक आलेत. ते आमचे आरक्षण घेऊन जातील. आमचे आरक्षण आता संपुष्टात आले हे सांगण्यास कोणतेही तत्वज्ञान मांडण्याची गरज नसल्याची टीका भुजबळांनी केली आहे.
ओबीसींच्या हक्कासाठी न्यायालयीन लढाई लढली जाईल, असेही भुजबळांनी ठामपणे सांगितले आहे. गरज पडली तर सरकारमधून बाहेर पडेन, पण मी माझी भूमिका बदलणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मराठा आरक्षणाच्या राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेविरोधात ओबीसी नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात पुढील रणनीती ठरवण्यासाठी छगन भुजबळांच्या मुंबईतल्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. त्यात मागासवर्ग आयोग, न्या. शिंदे समिती रद्द करण्याची मागणी करण्यात आली.  तसेच अधिसूचनेविरोधात लाखोंच्या संख्येनं हरकती नोंदवण्याचा निर्धार करण्यात आला. दरम्यान, तुम्ही घेतलेल्या भूमिकेला पक्षामधून किंवा सरकारमधून पाठिंबा मिळाला नाही, तर मंत्रिमंडळातून बाहेर पडणार का? असा प्रश्‍न माध्यमांनी विचारल्यानंतर मंत्री भुजबळ म्हणाले, माझी भूमिका पटत नसेल तर पक्षाने मला खुशाल बाहेर काढावे, माझी आमदारकी रद्द करावी, सरकारमधून मला बाहेर काढावे. मी ओबीसींसाठी कायम लढत राहिल, माझे काम अजिबात सोडणार नाही, असे भुजबळांनी ठामपणे सांगितले आहे. मी जाणिवपूर्व आरक्षणावर बोलत असल्याचे तुम्हाला वाटते का? आमच्या ओबीसीत बॅकडोअर लोक घुसवले जात आहेत. हे कोण करत आहे? त्याचा विचार करा. यात पीएचडी करण्याची गरज आहे? वाटेल त्याला कुणबी सर्टिफिकेट दिले जात आहे. पक्के घर असले तरी झोपडी दाखवली जात आहे. सुशिक्षितांना निरक्षर दाखवले जात आहे. नोकरी लपवून ठेवली जात आहे. घरासमोर गाडी ट्रॅक्टर असले तरी मोलमजुरी करतो म्हणून सांगितले जात आहे. येथे मंत्रिमंडळातील हुद्द्याचा कोणताही संबंध नाही. ओबीसी बांधवांचे भटक्यांचे कित्येक वर्षांनी मिळणारे आरक्षण समाप्त होत आहे याची आग मनात भडकत आहे, असेही भुजबळ यावेळी आपला संताप व्यक्त करताना म्हटले आहे.

ओबीसी आरक्षणात आता हजार वाटेकरी – ओबीसी आरक्षणामध्ये पूर्वी वाटेकरी कमी होते, मात्र आता वाटेकरी वाढत आहे. आमच्यात विविध जातींचे 374 वाटेकरी होते. आता हजार वाटेकरी झालेत. यामुळे आमचा वाटा कमी झाला, एवढे हे साधे गणित आहे. यासाठी कोणतेही मोठे तत्त्वज्ञान मांडण्याची गरज नाही. ओबीसींच्या 54 टक्क्यांत आणखी 20-25 टक्के घुसवले तेही बलंदड. विमुक्त भटके जमातीतील लोक असतील किंवा इतर ओबीसी जाती असतील या सर्वांचे आरक्षण आता हे बलदंड लोकं घेऊन जातील अशी शंका मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS