पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून तिरंग्याचा अवमान ; कारवाईसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून तिरंग्याचा अवमान ; कारवाईसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार

अहमदनगरच्या ’गांडू’ माध्यमांनी प्रकरण दाबले ; संपादक अशोक सोनवणे न्यायालयात दाखल करणार याचिका

अहमदनगर प्रतिनिधी: प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी सकाळी नऊच्या सुमारास अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या आवारामध्ये ध्वज फ

वरखेड यात्रा नियोजनासाठी उद्या नगरला होणार बैठक
*गणेशाला घडविणारे मूर्तिकार संकटात, यंदाही आर्थिक नुकसानीची भीती | सुपरफास्ट महाराष्ट्र | LokNews24*
दरवाजा उघडता उघडता…पायाजवळची पर्स झाली गायब

अहमदनगर प्रतिनिधी: प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी सकाळी नऊच्या सुमारास अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या आवारामध्ये ध्वज फडकवणे कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून तिरंगा राष्ट्रध्वजाचा अवमान झाला आहे. या गंभीर प्रकारामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असून अहमदनगरच्या माध्यमांनी हा प्रकार दाबण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. दरम्यान दोषींवर गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेल्या दैनिक लोकमंथनच्या संपादकांची फिर्याद पोलिसांनी घेतली नसल्याने न्यायालयाकडे याचिका दाखल केली जाणार आहे.
भारताचा राष्ट्रध्वज हा भारतीय लोकांच्या आशा आणि आकांक्षाचे प्रतिनिधित्व करतो. भारतीय राष्ट्रध्वज आपल्या राष्ट्राच्या अभिमानाचे प्रतीक आहे. या तिरंग्या राष्ट्रध्वजाचे रक्षण करण्यासाठी भारतीय जवानांसह अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा फडकविण्याची संहिता (कायदा) आहे. मात्र अहमदनगरमध्ये 26 जानेवारी रोजी सकाळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भारतीय ध्वज संहिता आणि भारतीय संविधानाचा भंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलीस अधिक्षक मनोज पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला असून या दोषी असलेल्या सर्वावर गुन्हा दाखल करण्याची मागणी दैनिक लोकमंथनचे संपादक डॉ. अशोक सोनवणे यांनी केली आहे. दरम्यान ते शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले असता पोलीस निरीक्षक श्रीमती गडकर रजेवर गेल्याचे कारण सांगून फिर्याद घेण्यास नकार देण्यात आला आहे. या प्रकरणी संपादक अशोक सोनवणे हे न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. या प्रकरणी दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. दरम्यान हा गंभीर प्रकार अहमदनगरच्या गांडू माध्यमांनी दडपून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.

असा आहे नियम
15 ऑगस्ट रोजी स्वातंत्रदिनी झेंडा उघडलेल्या अवस्थेत खालून वर चढवून वर नेऊन फडकविण्याच्या कृतीस ध्वजारोहण म्हटले जाते. तर 26 जानेवारीला बंद घडी करून सरकफासाची दोरीची गाठ बांधून झेंडा वर नेलेला असतो. फक्त दोरी ओढून ध्वज वरच्यावर फडकाविला जातो. यासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने ’भारतीय राष्ट्रध्वज संहिता’ तयार करण्यात आली आहे.

असा आहे फरक
15 ऑगस्ट हा आपल्याला स्वातंत्र मिळाले तो दिवस. तर 26 जानेवारीला आपले संविधान लागू झाले. 15 ऑगस्टला ध्वजवंदनाचा मान पंतप्रधानांना असतो कारण ते देशाचे प्रमुख राजनितीक असतात तर 26 जानेवारीला हा मान राष्ट्रपतींचा असतो कारण ते देशाचे संवैधानिक प्रमुख असतात. 26 जानेवारी 1950 ला स्वतंत्र भारताची घटना लागू झाली. त्यापूर्वी देशाला घटना नव्हती आणि राष्ट्रपती नव्हते.

असे असते नियोजन
15 ऑगस्टच्या ध्वजारोहण समारंभानंतर पंतप्रधान देशाला उद्देशून भाषण करतात पण या दिवशी परेड होत नाही आणि 14 ऑगस्टरोजी सायंकाळी राष्ट्रपती देशाला संदेश देतात. 26 जानेवारीला राष्ट्रपती झेंडा फडकवितात पण भाषण करत नाहीत. या दिवशी राजपथावर अतिशय देखणे संचलन होते. त्यात भारताच्या जल, थल आणि वायुसेना त्यांची ताकद दाखवितात तसेच अनेक राज्यांचे रथ विविध संस्कृतीचे दर्शन घडवितात. 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाला बाहेरच्या देशातून कुणी प्रमुख पाहुणे बोलावले जात नाहीत तर 26 जानेवारीला बाहेरच्या देशातील सन्मान्य नेत्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाते.

COMMENTS