आंतरजातीय विवाहामुळे नव दाम्पत्याला सोडावे लागले गाव

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आंतरजातीय विवाहामुळे नव दाम्पत्याला सोडावे लागले गाव

जळगाव : आंतरजातीय विवाहासंदर्भात अजूनही भारतीय समाजाचे मानसिकता ही मागासलेपणाची असल्याचे दिसून येते. जळगावात अशाच एका नव विवाहित दाम्पत्याला आंतरजाती

बॉम्बस्फोटप्रकरणी 38 आरोपींना फाशी | LOKNews24
प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल जाधव संकुल विद्यार्थांचे पिंचाक सिलेक्ट  मध्ये व घवघवीत यश
‘…बस चमचो से परेशान है’

जळगाव : आंतरजातीय विवाहासंदर्भात अजूनही भारतीय समाजाचे मानसिकता ही मागासलेपणाची असल्याचे दिसून येते. जळगावात अशाच एका नव विवाहित दाम्पत्याला आंतरजातीय विवाहामुळे गाव सोडण्याची नामुष्की ओढवली. ही घटना जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात एका गावात घडलेली आहे. या घटनेत आंतरजातीय विवाह करणार्‍या दाम्पत्यावर गाव सोडण्याची वेळ आलेली आहे. पारोळा तालुक्यातील या तरुण-तरुणीने एकमेकांच्या सहमतीने 15 ऑगस्ट रोजी आंतरजातीय विवाह केला होता. या लग्नाला मुलीच्या घरातील लोकांचा विरोध होता. मात्र, लग्नानंतर या दोघे जण पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी दोघांच्याही पालकांना बोलावून परिस्थिती समजून सांगून मुलगी सज्ञान असल्याने आपल्या पतीसोबत राहण्याचे मान्य केल्यामुळे कायदेशीरित्या तशी पोलिसांत नोंद झाली. मात्र, मुलीच्या घरातील सदस्यांकडून मुलाच्या नातेवाईकांना आणि त्यांला त्रास दिला जात आहे. याबाबत पारोळा पोलिसांत तक्रार दिल्यानंतरही पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप मुलाने केला आहे. ही कारवाई व्हावी, यासाठी पोलीस अधीक्षकांना तक्रार दिली आहे.

COMMENTS