नगरच्या बालगृहातून अल्पवयीन मुलाचे झाले अपहरण…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरच्या बालगृहातून अल्पवयीन मुलाचे झाले अपहरण…

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर-पुणे रोडवरील केडगाव उपनगरातील भूषणनगर येथील संकल्प प्रतिष्ठान संचलित सावली बालगृह येथून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणा

आमदार लंकेच्या उपोषणाच्या समर्थनार्थ पाथर्डीत रस्ता रोको
आ. संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावले
“आता लॉकडाउन लावावाच लागेल” | Maharashtra Lockdown |

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर-पुणे रोडवरील केडगाव उपनगरातील भूषणनगर येथील संकल्प प्रतिष्ठान संचलित सावली बालगृह येथून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणांसाठी सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलास पळवून नेले आहे. ही घटना सोमवारी (दिनांक 3) घडली. जाकीर शाहीद अन्सारी ऊर्फ मुतर्‍या (वय 17 वर्षे, रा. सागर नाश्ता सेंटर, श्रीरामपूर, जि. अ.नगर) असे अपहृत बालकाचे नाव आहे.
या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी सावली बालगृहाचे अधीक्षक अजिंक्य दिलीप आंधळे (वय 27, राहणार भूषणनगर, केडगाव, अ.नगर. मूळ राहणार जवखेडे, ता.पाथर्डी, जि. अ.नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरूध्द भारतीय दंड विधान कायदा कलम 363 प्रमाणे अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस हवालदार बी. एम. ईखे करीत आहे.
अपहृत बालकाचे वर्णन असे- नाव- जाकीर शाहीद अंसारी ऊर्फ मुतर्‍या (वय 17 वर्षे), रंग गोरा, उंची 5.6 फुट इंच, चेहरा उभट, नाक- सरळ, डोळे काळे, दोन्ही हाताचे कांबीवर एएआय हे कोरलेले आहे. नेसणीस आकाशी रंगाचा टी शर्ट, हिरवट रंगाची जिन्स पॅन्ट, असे वर्णन आहे. या वर्णनाचा मुलगा कुणाला दिसल्यास अगर त्याच्याबद्दल कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी कोतवाली पोलिस ठाणे फोननंबर 0241-2416117 आणि पोलिस हवालदार ईखे (मोबाईल नंबर 9923600605) या वर संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, भूषणनगरच्या प्रसिद्ध असलेल्या सावली बालगृहातून अल्पवयीन मुलाचे अज्ञाताकडून अपहरण झाल्याने व कोणीतरी अज्ञाताने या बालकाला कायदेशीर रखवालीतून पळवून नेल्याचे खळबळ उडाली आहे.

COMMENTS