पॉझिटिव्हिटी रेट 10 असल्यास लागणार निर्बंध ; केंद्र सरकारचे राज्यांसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पॉझिटिव्हिटी रेट 10 असल्यास लागणार निर्बंध ; केंद्र सरकारचे राज्यांसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर

नवी दिल्ली : देशात ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण झपाटयाने वाढत असल्यामुळे केंद्र सरकारने बुधवारी राज्यांसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली असून, जिल्ह्या

25 गोशाळेसाठी वर्धमान संस्कार धामकडून 25 लाखांची देणगी
मंत्रालयात नोकरी लावण्याचे सांगत पाच लाखांची फसवणूक
राजधानीतील आक्रोश

नवी दिल्ली : देशात ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण झपाटयाने वाढत असल्यामुळे केंद्र सरकारने बुधवारी राज्यांसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली असून, जिल्ह्यात गेल्या आठवड्यातील पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास किंवा ऑक्सिजन तसंच आयसीयू बेडसाठी 40 टक्के व्याप्ती असेल तर तिथे निर्बंध लावले जाऊ शकतात असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले आहे.
या शिफारशींमध्ये जास्त पॉझिटिव्हीटी रेट असणार्‍या जिल्ह्यांमध्ये करोनाला रोखण्यासंबंधीची धोरणं आणि निर्बंधांचा उल्लेख आहे. नाईट कर्फ्यू, गर्दीवर बंदी आणि लग्नातील उपस्थिती कमी करण्यासंबंधी या शिफारशींमध्ये सांगण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्र पाठवले असून स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घ्यावेत असे सांगितले आहे. जिल्ह्यात गेल्या आठवड्यातील पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास किंवा ऑक्सिजन तसेच आयसीयू बेडसाठी 40 टक्के व्याप्ती असेल तर तिथे निर्बंध लावले जाऊ शकतात असे आरोग्य मंत्रालायने सांगितले आहे.
आरोग्य मंत्रालयाने सध्याच्या पुराव्यांनुसार, ओमायक्रॉन डेल्टाच्या तुलनेत तीन पाट जास्त संसर्गजन्य असल्याचं अधोरेखित केले आहे. तसेच जिल्हास्तरावर निर्णय घेताना अत्यंत तत्परता आणि लक्ष असण्याची गरज असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. ओमायक्रॉनसोबतच देशातील अनेक भागांमध्ये अद्यापही डेल्टा उपस्थित आहे. त्यामुळे स्थानिक आणि जिल्हा स्तरावर दूरदृष्टी, डेटा विश्‍लेषण, महत्वाचे निर्णय घेणे आणि कठोर तसेच त्वरित प्रतिबंधात्मक कारवाई गरजेची आहे, असे आरोग्य मंत्रालयाने राज्यांना सांगितलं आहे.

प्रतिबंधात्मक उपायांसाठी मार्गदर्शक सूचना
आरोग्य मंत्रालयाने राज्यांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नाईट कर्फ्यू, गर्दींसाठी कठोर नियम, लग्न आणि अंत्यविधींमध्ये कमी उपस्थिती, कार्यालये, उद्योग आणि सार्वजनिक वाहतुकींसाठी नियमावली स्पष्ट केल्या आहेत. केंद्राने यावेळी दारोदारी जाऊन रुग्णांचा शोध घेणे आणि करोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील सर्वांची माहिती घेण्यासंबंधी सुचवलं आहे. जिल्ह्यांमध्ये घरोघरी जाऊन शोध घेणे, इतर व्याधी असणार्‍यांची चाचणी, रोज योग्य प्रमाणात आरटीपीसीआर चाचणी करणं आणि कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे. याशिवाय गृहविलगीकरणाची अमलबजावणी होईल याची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. 100 टक्के लसीकरण होईल यासाठी राज्यांनी जास्त प्रयत्न करावेत असे यावेळी सुचवण्यात आले आहे.

महाराष्ट्रात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 65 वर
राज्यात दिवसभरात ओमायक्रॉनचे 11 नवीन रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत या रुग्णांची संख्या 65 झाली आहे. नव्याने आढळलेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक पाच हे मुंबईतील आहेत.

COMMENTS