ठाण्यातील मनसे पदाधिकारी जमील शेख यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी तपास करून एका आरोपीला उत्तर प्रदेशमधून अटक केली आहे.
मुंबई/प्रतिनिधीः ठाण्यातील मनसे पदाधिकारी जमील शेख यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी तपास करून एका आरोपीला उत्तर प्रदेशमधून अटक केली आहे. या आरोपीने राष्ट्रवादीचे नगरसेवक नजिब मुल्ला यांच्या सांगण्यावरून ही हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर राज ठाकरे यांनी आता या प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेत नजिब मुल्ला यांच्यावर कारवाईची मागणी केली. सत्ताधार्यांची माणसे दिवसाढवळ्या खून करीत आहेत. खुनाला खुनाने उत्तर द्यायला सुरुवात झाली, तर सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये हे चित्र चांगले दिसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
याबाबत राज म्हणाले, की जमील शेख यांची हत्या झाली होती. या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी एका आरोपीला उत्तर प्रदेशमधून अटक केली. आरोपीने दिलेल्या कबुलीजबाबात राष्ट्रवादीचे नगरसेवक नजिब मुल्ला यांचे नाव आले आहे. सत्ताधार्यांची माणसे दिवसाढवळ्या खून करीत आहेत. याच नजिब मुल्ला यांचे नाव सूरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणात आले होते. पुढे ते प्रकरण निस्तरले गेले. पुन्हा या नजिब मुल्लाचे नाव आले आहे. राज्य सरकार काय कारवाई करते ते पाहावे लागेल. या प्रकरणी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेणार असल्याचेही राज यांनी सांगितले. अशी मंडळी त्यांना पक्षात सांभाळायची असतील तर दुसर्यांचे हात काही बांधलेले नसतात. खुनाला खुनाने उत्तर द्यायला सुरुवात झाली, तर सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये हे चित्र चांगले दिसणार नाही. नजिब मुल्ला याच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे, असे राज म्हणाले.
COMMENTS