Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा परिषदेतील ५१ परिचर यांना कनिष्ठ सहाय्यक पदी पदोन्नती 

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागांतर्गत ५१ कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्त

न्यायाधीशांच्या नियुक्त्यांचा घोळ
गृहखात्याचा मोठा निर्णय, मुंबईत ३ हजार कंत्राटी पोलीस भरती
तुम्हाला तुमच्या जन्मदात्याचा अभिमान नाही, ही कुठली संस्कृती ?

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागांतर्गत ५१ कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या कै.रावसाहेब थोरात सभागृहात समुपदेशनाने पदोन्नती प्रक्रिया पार पडली. यामध्ये परिचर या पदावरून कनिष्ठ सहाय्यक लिपिक या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्हा परिषद अधिनस्त सर्व विभागांनी पदोन्नती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी असे निर्देश दिले होते, यानुषंगाने सामान्य प्रशासन विभागाच्या तत्परतेने मागील महिन्यात अनुकंपा कर्मचारी गट ड मधून गट क संवर्गात समुपदेशनाचे समायोजन करण्यात आले. यानंतर आज सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने परिचर संवर्गातुन पदोन्नती प्रक्रिया राबवण्यात आली. परिचर संवर्गातून ४९ तर वाहन चालक संवर्गातून २ कर्मचारी यांना पदोन्नती देण्यात आली.

दि. ८ फेब्रुवारी रोजी सामान्य प्रशासन विभागांतर्गत परिचर कर्मचारी पदोन्नती संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली पदोन्नती समितीची बैठक घेण्यात आली यामध्ये उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रदीप चौधरी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील, सहायक गट विकास अधिकारी ग्रामपंचायत प्रशांत पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन तथा सदस्य सचिव रवींद्र परदेशी यांनी १४० पदोन्नती प्रस्तावांची पडताळणी केली यापैकी ६६ प्रस्ताव पदोन्नती समितीने पात्र ठरवले. दि. १५ रोजी परिचर या पदावरून कनिष्ठ सहायक पदावर अशा एकूण ५१ परिचर कर्मचाऱ्यांना समुपदेशनातुन पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली. पदस्थापना देण्यात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते पदोन्नतीचे आदेश देण्यात आले. समुपदेशानातुन पदोन्नती प्रक्रिया पार पडल्यामुळे पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले. या पदोन्नती प्रक्रियेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक प्रशासन अधिकारी रवींद्र आंधळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सोनाली भार्गवे, गणेश बगड, स्वीय सहायक गौतम अग्निहोत्री,  लघुलेखक साईनाथ ठाकरे, वरिष्ठ सहायक भास्कर कुवर, कनिष्ठ सहायक कानिफनाथ फडोळ, सरला सोनार आदि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS