महागाईचा भडका !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

महागाईचा भडका !

एकीकडे देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आलेली असतांना, देशात वाढत चाललेली महागाई हा चिंतेचा विषय बनतांना दिसून येत आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्या

गोवरचा विळखा
अराजकता निर्माण करण्याचा डाव
सत्ता संघर्षात व्हीपचा मुद्दा

एकीकडे देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आलेली असतांना, देशात वाढत चाललेली महागाई हा चिंतेचा विषय बनतांना दिसून येत आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. गेल्या महिन्यात घाऊक माहागाई तब्बल 12.54 टक्क्यांनी वाढल्याची माहिती अहवालातून समोर आली आहे. तर सप्टेंबर महिन्यामध्ये हेच प्रमाण 10.66 टक्के इतके होते. सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या पाच महिन्यांच्या तुलनेत या महिन्यामध्ये महागाई उच्चस्थरावर पोहोचली आहे. झपाट्याने होत असलेल्या इंधन आणि विजेच्या दरवाढीमुळे महागाई वाढत आहे.
अन्नधान्य व इंधनाच्या किंमती सातत्याने वाढत चालल्या आहेत. जीएसटीने गेल्या महिन्यात नवा विक्रम स्थापित केला असला, तरी राज्यांना जीएसटीपोटी हवा तसा निधी मिळतांना दिसून येत नाही. त्यामुळे केेंद्र-राज्य संघर्ष यातून उभा राहतांना दिसून येत आहे. त्यातून मग राज्यांची परिस्थिती ही बिकट होत चालली आहे. यातून मार्ग काढण्याचे, त्यातच राजकारणांतील पेचमधून मार्ग काढण्यासह अनेक प्रश्‍न सध्या मोदी सरकारसमोर आहे केंद्र सरकारने महागाईबाबत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या सप्टेंबर महिन्यात महागाई 10.66 टक्क्यांनी वाढली होती. तर ऑक्टोबर महिन्यामध्ये ती 12.54 टक्क्यांवर पोहोचली आहे, याचाच अर्थ असा की गेल्या एका महिन्यामध्ये घाऊक महागाईत तब्बल 1.14 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे या महिन्यात अन्न, धान्यांसोबतच भाजीपाल्याचे रेट देखील वाढले आहेत. किंमती कमी करण्याचे आश्‍वासन देवून मोदी सत्तेत स्थानापन्न झाले आणि महागाई कमी करण्यात त्यांना आलेले अपयश लपविण्यासाठी बाजारपेठीतील तथाकथित संशोधन संस्था यांच्या माध्यमातून घाऊक महागाई निर्देशांक कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अर्थात घाऊक बाजारपेठेत फारशी महागाई कधीच नसते. कारण शेतीमालाची घाऊक बाजारपेठ ही शेतकर्‍यांकडून माल खरेदी करण्याची असते. शेतकर्‍याला मालाचा योग्य भाव मिळू नये यासाठी व्यापारी प्रयत्नशिल असतात. त्यांना घाऊक बाजारपेठेत कितीही स्वस्त मिळाली तरी किरकोळ विक्री करतांना ते किमान पाच ते दहा पट किंमतीलाच त्या वस्तूची विक्री करतात. त्यामुळे घाऊक बाजारपेठेत किंमत नियंत्रित रहात असली तरी कीरकोळ बाजारपेठेत किंमती भडकलेल्याच असतात. याचच अर्थ सर्व सामान्य जनतेच्या दृष्टीने महागाई आहे तशीच असते आणि आहे. पूर्वीचे कांद्याचे, डाळीचे दर बघितले, म्हणजे महागाई किमान चारपटीने आजही कायम आहे. परंतु सर्वसामान्य जनतेला महागाई कमी झाल्याचे सांगून नवे सरकार कसे आपल्या धोरणात यशस्वी झाले आहे, याची अप्रत्यक्ष भलावण यातून केली जात आहे. महागाई कमी होणार की वाढणार हे पूर्णपणे इंधनाच्या किमतीवर अवलंबून असते. गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. विजेचे दर देखील वाढवण्यात आले आहेत. सोबतच एलपीजी गॅसच्या किमती देखील गगणाला भिडल्या आहेत. याचा परिणाम म्हणजे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली. दरम्यान सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाले. इंधन स्वस्त झाले नसते तर या महिन्यामध्ये महागाई आणखी वाढली असती.आता इंधन स्वस्त झाल्याने पुढील महिन्यात कदाचीत काही प्रमाणात महागाई कमी होऊन, सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो. यावरुन आपणांस असे दिसून येईल की मोदी सरकार जी आश्‍वासने देवून सत्तेत आले आहेत, त्यांची पूर्तता न करता लोकांना मुर्ख बनविण्यात गुंतले आहे. परंतु त्यांना कुणीतरी कल्पना द्यायला हवी, की जगात सगळ्या लोकांना सर्वकाळ मुर्ख बनविता येत नाही. त्यामुळे सुर्य आणि जयद्रथ कधीतरी समोरासमोर येणारच!

COMMENTS