Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा बँक निवडणुकीत सातारचे दोन्ही राजे बिनविरोध; 11 संचालक बिनविरोध

सातारा / प्रतिनिधी : राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना यांच्या महाआघाडीच्या राजकारणात भाजपच्या नेत्यांना जिल्हा बँकेत संधी मिळणार का? अशी चर्चा असतानाच

ऐन दिवाळीत ऊसदरासाठी रस्त्यावर उतरू; शेतकरी संघटनांचा इशारा
नवीन मक्याचे वाण देते १००-१०५ दिवसांत बंपर उत्पादन
बोंडारवाडी धरणासाठी आवश्यक निधी देणार : ना. अजित पवार यांची माहिती

सातारा / प्रतिनिधी : राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना यांच्या महाआघाडीच्या राजकारणात भाजपच्या नेत्यांना जिल्हा बँकेत संधी मिळणार का? अशी चर्चा असतानाच भाजपचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, अनिल देसाई या तिघांना बिनविरोध संचालक होता आले. मात्र, उर्वरितांना निवडणूकीच्या रिंगणात उतरावे लागले आहे. मग त्यामध्ये काँग्रेसचा असो अथवा राष्ट्रवादीचा मताधिक्क्याच्याच जोरावर आता संचालक होण्याची संधी आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे होवू घातलेली निवडणूक वादळी होणार असल्याची चर्चा होती. या बँकेची निवडणूक चक्क सहकार मंत्री बाळासाहेब पाटील लढत आहे. त्यांच्या विरोधात गेल्या 55 वर्षापासून संचालक म्हणून काम केलेले दिवंगत माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर लढत आहेत. त्यामुळे या निवडणूकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी खासदार उदयनराजे भोसले आणि सातारा तालुका विकास सेवा सोसायटीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. खासदार उदयनराजे यांनी गृहनिर्माणमधून अर्ज दाखल केला होता. त्यांच्याविरोधात सभापती रामराजे समर्थक ज्ञानदेव पवार, दिलीप सिंह भोसले, उदयसिंह बरदाडे यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, अर्ज माघार घेण्याचा शेवटच्या दिवशी यांच्यासह अन्य उमेदवारांनी माघार घेतल्याने उदयनराजेंची बिनविरोध निवड झाली. तर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या विरोधात विनय कडव आणि पांडुरंग देशमुख यांनी अर्ज दाखल केले होते. त्यांनीही अर्ज काढून घेतल्याने शिवेंद्रसिंहराजे भोसले हेही बिनविरोध निवडून आले आहेत.
आत्तापर्यंत 11 संचालक बिनविरोध निवडूण आले आहेत. बिनविरोध निवडून आलेले संचालक : खरेदी विक्री – आ. मकरंद पाटील, कृषी प्रक्रिया -शिवरूपराजे खर्डेकर, गृहनिर्माण – खासदार उदयनराजे भोसले, भटक्या विमुक्त जमाती – लहू जाधव, अनुसूचित जाती जमाती – सुरेश सावंत, औद्योगिक व विणकर – अनिल देसाई. प्राथमिक कृषी पतपुरवठा गट मतदारसंघ – सातारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, फलटण – रामराजे नाईक-निंबाळकर, खंडाळा – दत्तानाना ढमाळ, वाई – नितीन पाटील, महाबळेश्‍वर – राजेंद्र राजपुरे यांच्या बिनविरोध निवडी झाल्या आहेत.

COMMENTS