Ahmednagar : शहरात खळबळ… पोलीस ठाण्यातच आढळला मृतदेह

Homeशहरंअहमदनगर

Ahmednagar : शहरात खळबळ… पोलीस ठाण्यातच आढळला मृतदेह

नगर शहरातील कोतवाली पोलिस ठाण्याच्या आवारात मध्ये असलेल्या स्वच्छतागृहामध्ये एका इसमाचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणा

पर्यटन विकास आराखड्यात कोपरगावला प्राधान्य द्या
भंडारदराच्या पर्यटन विकास आराखड्यासंदर्भात आ. सत्यजीत तांबेंनी घेतली नव्या पर्यटन मंत्र्यांची भेट  
मनमाड महामार्गाच्या दुरावस्थेबाबत फलक लावून निषेध

नगर शहरातील कोतवाली पोलिस ठाण्याच्या आवारात मध्ये असलेल्या स्वच्छतागृहामध्ये एका इसमाचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणात संदर्भांमध्ये कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर शहर विभागाचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी या घटनेची माहिती घेतली आहे.
गेल्या दोन दिवसापासून कोतवाली पोलिस ठाण्याच्या आवारातील स्वच्छतागृहांमध्ये सदरचा इसम हा होता. त्याने गळफास घेऊन स्वच्छतागृहात आत्महत्या केला असल्याचे बोलले जात आहे. अतिशय दुर्गंधी सुटल्याने नेमका वास कुठून, कसा येतो याची माहिती घेण्यात आली. त्यानंतर स्वच्छतागृहांमध्ये आतील बाजूला कडी लावून घेतलेली असल्याचे लक्षात आले. बाहेरून पाहिल्यावर इसम आत मध्ये असल्याचे लक्षात आले व तो मृतावस्थेत असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी तात्काळ याची माहिती वरिष्ठांना दिली. पोलिस उपअधीक्षक अजित पाटील हे घटनास्थळी दुपारी दाखल झाले आहेत.

COMMENTS