दसरा मेळावा होणारच… संजय राऊत म्हणाले…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दसरा मेळावा होणारच… संजय राऊत म्हणाले…

प्रतिनिधी : मुंबई शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याविषयी (Dussehra Melava) मोठे भाष्य केले आहे.  राज्यात कोरोना स

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणातली नैतिक पातळी राखली पाहिजे – संजय राऊत 
खा.संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल
Sanjay Raut : निवडणुकीतील पराभवाच्या भीतीनेच मोदी सरकारने काळे कायदे मागे घेतले | LokNews24

प्रतिनिधी : मुंबई

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याविषयी (Dussehra Melava) मोठे भाष्य केले आहे. 

राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा (Shivsena) बहुचर्चित दसरा मेळावा गेल्या वर्षी ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला होता. 

मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून दसरा मेळावा होणार, अशी माहिती राऊत (Sanjay Raut) यांनी दिली. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

तसेच मेळाव्याच्या स्वरुपाविषयीही त्यांनी माहिती दिली. यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा नक्कीच होईल आणि तो ऑनलाईन पद्धतीने होणार नाही. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी चर्चा करुन दसरा मेळाव्यासंबंधित निर्णय घेण्यात येईल, असेही राऊत म्हणाले.

मागील वर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर झाला नाही. मोजकेच नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात ऑनलाईन पद्धतीने पार पडला होता.

COMMENTS