E20 पेट्रोलवरून देशात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला विरोध होत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत मोठा दावा

E20 पेट्रोलवरून देशात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला विरोध होत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत मोठा दावा केला आहे.गडकरी यांच्या म्हणण्यानुसार, E20 इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम कमी झाला असून देशाचे हजारो कोटी रुपये वाचत आहेत.सरकारचा दावा आहे की, जर E20 पेट्रोलचा पर्याय नसता तर पेट्रोलचे दर 125 रुपयांपर्यंत जाऊ शकले असते. तर इथेनॉल मिश्रित पेट्रोल 70 रुपयांपर्यंत स्वस्त पडू शकते.मात्र, E20 पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनवर परिणाम होतो का? यावरून विरोधक आणि नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.आता E20 पेट्रोलच्या समर्थनात सरकारचे दावे आणि विरोधकांचे आरोप यामुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

COMMENTS