Homeताज्या बातम्या

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची जिल्हा कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक शनिवारी पडणार पारजिल्ह्यातील समता परिषदेचे पदाधिकारी आणि समता सैनिकांनी उपस्थित राहावे – नितीन राऊत

बीड : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. छगनरावजी भुजबळ साहेब, समता परिषदेचे कार्य

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदलाचे संकेत; महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांच्या नावाची चर्चा
महात्मा फुले द्विशताब्दी जयंतीनिमित्तविशेष चित्ररथाचे महाराष्ट्रभर होणार भ्रमण
राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारीखासदार प्रफुल्ल पटेल यांचे विश्‍वासू सहकारी म्हणून ओळख


बीड : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. छगनरावजी भुजबळ साहेब, समता परिषदेचे कार्याध्यक्ष तथा माजी खासदार समीरभाऊ भुजबळ, समता परिषदेचे कार्याध्यक्ष तथा आमदार पंकजभाऊ भुजबळ यांच्या आदेशानुसार समता परिषदेचे सरचिटणीस ड. सुभाष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यामध्ये समता परिषदेचे संघटन वाढविण्यासाठी जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन शनिवार दि. 1 ऑगस्ट 2026 रोजी करण्यात आले असल्याची माहिती समता परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष निखिल शिंदे व शहराध्यक्ष नितीन राऊत यांनी दिली असून या बैठकीस बीड जिल्ह्यातील समता परिषदेचे पदाधिकारी आणि समता सैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नितीन राऊत यांनी केले आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, बीड जिल्ह्यातील समता परिषदेचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी समता परिषदेच्या कार्यकारिणीवर काही महत्वपूर्ण बदल तसेच समता सैनिकाची नवीन नियुक्ती करण्यासाठी समता परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. छगनरावजी भुजबळ साहेब, समता परिषदेचे कार्याध्यक्ष तथा माजी खासदार समीरभाऊ भुजबळ, समता परिषदेचे कार्याध्यक्ष तथा आमदार पंकजभाऊ भुजबळ यांनी आदेशित केले असून समता परिषदेचे सरचिटणीस ड. सुभाष राऊत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा कार्यकरणीवर्ती महत्वाचे फेरबदल तथा जिल्ह्यातील तालुक्यांची कार्यकारिणी  करण्यासाठी सदरील बैठकीचे आयोजन शनिवार दि. 1 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 : 30 वाजता शासकीय विश्रामगृह बीड येथे करण्यात आले आहे. या बैठकीस बीड जिल्ह्यातील समता परिषदेचे पदाधिकारी तथा समता सैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन समता परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष निखिल शिंदे जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश उगले, बीड शहराध्यक्ष नितीन राऊत, धनंजय काळे यांनी केले आहे.

COMMENTS