Homeताज्या बातम्या

पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी गुन्हा दाखलनोएडातील तरूणीविरूद्ध गुन्ह ; जंतर-मंतरवरील घोषणाबाजी प्रकरण

नवी दिल्ली : जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह घोषणा केल्याचा आरोप असलेल्या नोएडातील एका तरुणीविरुद्ध शून्य क्

धारणगाव-कोपरगाव रस्त्यावरील खड्डे बुजवा; राष्ट्रवादीची मागणी; नगरसेवक अत्तार यांचा आंदोलनाचा इशारा
अल्पवयीन मुलीच्या न्यायासाठी आईचा आक्रोश; तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण..‘दोषींना अभय देता का?’ पीडित मातेचा प्रशासनाला सवाल
पालकमंत्री नीतेश राणेंना कोर्टाचा दिलासा आणि दंड ही चिखललफेक प्रकरण : एक महिन्याचा कारावासासह एक लाखाचा दंड
Prime Minister of India - Simple English Wikipedia, the free encyclopedia


नवी दिल्ली : जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह घोषणा केल्याचा आरोप असलेल्या नोएडातील एका तरुणीविरुद्ध शून्य क्रमांकाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गाझियाबाद येथील एका वकिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे नोएडा द्रुतगती मार्ग पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास संबंधित ठाण्याकडे वर्ग करण्यात येणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीची ओळख रुचिका सिंग अशी करण्यात आली आहे. आंदोलनावेळी सार्वजनिक व्यासपीठावरून पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या वक्तव्यामुळे देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. या प्रकरणाशी संबंधित चित्रफिती, समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या ध्वनिचित्रफिती तसेच इतर उपलब्ध पुराव्यांची पडताळणी पोलीस करीत आहेत. तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, हिंदू सुरक्षा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष अनूप खेतान यांनीही समाजमाध्यमांवर एक चित्रफीत प्रसिद्ध करून संबंधित तरुणीविरुद्ध तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी संबंधित तरुणी ही जंतर-मंतरवरील आंदोलनात सहभागी झालेली व्यक्ती असल्याचा दावा केला असून, यासंदर्भातील कागदपत्रेही त्यांनी प्रसारित केली आहेत. मात्र, त्यांच्या दाव्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. अनूप खेतान यांनी नागरिकांना उत्तर प्रदेश पोलीस आणि नोएडा पोलिसांकडे या प्रकरणात त्वरीत कारवाईची मागणी करण्याचे आवाहन केले आहे.

COMMENTS