शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का ; शिंदेंकडून शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का ; शिंदेंकडून शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर

रामदास कदम यांचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात शिवसेना पुन्हा एकदा मोठया फुटीच्या उंबरटयावर असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे 14 खासदार शिंदे गटाच्या बैठकीला हजर असल्यामु

आठवडी बाजार भरू न दिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शेतमाल उधळून लावला | LOKNews24
शाळेत निघालेल्या अल्पवयीन विद्यार्थींनी बेपत्ता | LOKNews24
खासदार संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात शिवसेना पुन्हा एकदा मोठया फुटीच्या उंबरटयावर असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे 14 खासदार शिंदे गटाच्या बैठकीला हजर असल्यामुळे 14 खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट होत असतांनाच, मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून सेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. तर शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
शिंदे यांनी जाहीर केलेल्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून निवड करण्यात आली आहे तर दीपक केसरकर यांची मुख्य प्रवक्ते म्हणून निवड केली गेली आहे. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख पदाला हात लावण्यात आलेला नाही. शिंदे गटाकडून ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक सुरू होती त्यावेळी ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेचे 14 खासदारही उपस्थित होते.
दरम्यान, माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी त्यांनी राजीनामा पाठवला आहे. याआधी कदम यांचे पुत्र दापोलीचे आमदार योगेश कदम हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. राजीनामा देताना कदम म्हणाले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कामकाजावर नाराज आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नेतेपदी माझी नियुक्ती केली होती. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर या पदाला काहीच अर्थ राहिला नाही. माझ्यावर अनेकदा टीका करण्यात आली. मात्र माझे म्हणणे मांडण्यासाठी मला मीडियासमोर कधीच जाऊ दिले नाही. एवढेच नाही तर मला आणि माझा मुलगा योगेश कदम आमदार याला वारंवार अपमानित करण्याचा प्रयत्न पक्षातून झाला, असा आरोपही त्यांनी केला. पत्रात पुढे म्हटले आहे की, आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्‍वासात घेण्याचं काम आपल्याकडून कधीच झाले नाही. उलटपक्षी मला व माझ्या मुलाला म्हणजेच आमदार योगेश रामदास कदम याला अनेक वेळा अपमानित करण्यात आले. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आपण मला अचानक मातोश्रीवर बोलावून घेतले आणि मला आदेश दिले की यापुढे तुमच्यावरती कोणतीही टीका केली किंवा पक्षावर काही बोलले किंवा मातोश्रीवर कोणी काही बोलले तरी आपण मीडियासमोर अजिबात जायचे नाही. मीडियासमोर कुठलेही वक्तव्य करायचे नाही. यामागचे कारण मला आजपर्यंत कळू शकले नाही.

कदम व आनंद अडसूळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी
शिवसेना नेतेपदाचा राजीमाना दिल्यानंतर रामदास कदम यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कदम यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. कदम यांच्यासोबतच शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचीदेखील हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तसे आदेश दिल्याची माहिती शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाने दिली आहे.

शिवसेनेचे 14 खासदार शिंदे गटाच्या बैठकीला हजर
शिवसेनेला फुटीचे लागलेले ग्रहण अजूनही संपण्याची चिन्हे नाहीत. रामदास कदम यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची बैठक सुरू असताना शिवसेनेचे 14 खासदार हे ऑनलाईन बैठकीला हजर असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी शिंदे गटाच्या आमदारांची मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये शिवसेनेचे खासदार उपस्थितीत असल्याचा मोठा धक्का शिवसेनेला बसला आहे.

COMMENTS