Homeताज्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप; विष्णुपंत रसाळ सरांचा सामाजिक उपक्रम

बीड: मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा सेवक तथा माजी

‘शेत पाणंद’च्या सहअध्यक्षपदी अशोक खेडकर; कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्ती
नायगाव तालुक्यातील काही ग्रामसेवक ‘बिनपत्त्याचे’; मुख्यालयी वास्तव्यास नसल्याने नागरिकांचे हाल
“आमचा एकही आमदार फुटणार नाही!” – खासदार शरद पवारांचा बारामतीत ठाम विश्वास

बीड: मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा सेवक तथा माजी प्राचार्य विष्णुपंत रसाळ सर (रा. मांजरसुंबा, ता. जि. बीड) यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी कौतुकास्पद सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

गुरुवार, ३० जुलै २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कपीलधारवाडी येथे इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेतील एकूण १४ विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात अधिक प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण व्हाव्यात आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधने उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसून आला.

यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कपीलधारवाडी येथील सहशिक्षक काळे सर उपस्थित होते. त्यांनी या सामाजिक उपक्रमाचे स्वागत करत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास करून जीवनात यशस्वी होण्याचे आवाहन केले.

सामाजिक, शैक्षणिक आणि समाजोपयोगी कार्यातून वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श माजी प्राचार्य विष्णुपंत रसाळ सर यांनी समाजासमोर ठेवला आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातील नागरिक, पालक आणि शैक्षणिक क्षेत्रातून विशेष कौतुक होत आहे.

COMMENTS