Homeताज्या बातम्या

जेष्ठ क्रीडा शिक्षक शिवकुमार निर्मळे यांना ‘अजितदादा पवार सन्मान पुरस्कार’; घाटनांदुर येथे गुणवंतांचा गौरव

अंबाजोगाई: घाटनांदुर येथील वसुंधरा महाविद्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व वसुंधरा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित जनसेवा सप्ताह

राडी येथे खेती बचाव अभियानाचा शुभारंभ; शेतकर्‍यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन
वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून विद्यार्थ्यांनी पुढे जावे-हेमंत धानोरकरआई सेंटर प्रो: 21 डे चॅलेंज – अस्खलितपणे इंग्रजी बोलण्याचे आव्हान ; यशवंतांचा पालक सभेत गुणगौरव
मोदी सरकारच्या प्रस्तावित ऊस नियंत्रण  आदेशाला शेतकरी संघटनेचा विरोध

अंबाजोगाई: घाटनांदुर येथील वसुंधरा महाविद्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व वसुंधरा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित जनसेवा सप्ताहाच्या कार्यक्रमात जेष्ठ क्रीडा शिक्षक शिवकुमार निर्मळे यांना लोकनेते स्व. अजितदादा पवार सन्मान पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. हा कार्यक्रम लोकनेते स्व. अजितदादा पवार यांची जयंती व आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते व आंबा साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार संजय दौंड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दत्ता आबा पाटील, बबनराव लोमटे, शिवाजीराव शिरसाट, अजित गरड, राजेभाऊ औताडे, आयोजक गोविंदराव देशमुख, गुणवंतराव आगळे, मनोज गंगणे, बाळासाहेब देशमुख, सुधीर चाटे, प्रभारी प्राचार्य डॉ. अर्जुन मोरे, प्राचार्य व्ही. एल. गिते, मेहबूब शेख, बाळासाहेब शेप, बाबासाहेब इंगळे, वामन जाधव, डॉ. अब्दुल समद व संजीवनी देशमुख उपस्थित होते.

या प्रसंगी आयोजक गोविंदराव देशमुख, राजेभाऊ औताडे, दत्ता आबा पाटील, संजय दौंड आणि रमेशराव आडसकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान घाटनांदुर परिसरातील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच नीट (NEET), जेईई (JEE), एमबीए आणि जी-सॅट सारख्या प्रवेश परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच चंदनवाडीचे आदर्श सरपंच ज्ञानेश्वर गिते, उत्कृष्ट शेतकरी हनुमंतराव आगळे, आदर्श शिक्षक व पत्रकार शिवकुमार निर्मळे, वृक्षमित्र सुधाकर देशमुख, आदर्श पत्रकार अ. र. पटेल, प्रा. सुरेश मोदी, प्रा. अनंत कांबळे, ऋषिकेश मुंडे व पैलवान विजय गिते यांना विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर चाटे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. मकरंद जोगदंड यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रभारी प्राचार्य डॉ. अर्जुन मोरे यांनी मानले.

COMMENTS