बीड: मतदारांसाठी सुरू करण्यात आलेली एसआयआर (SIR) प्रक्रिया सुरू झाल्यापासून मतदारांची डोकेदुखी मोठ्या प्रमाणात वाढली होती. अशा अवस्थेत बीएलओ म्हण

बीड: मतदारांसाठी सुरू करण्यात आलेली एसआयआर (SIR) प्रक्रिया सुरू झाल्यापासून मतदारांची डोकेदुखी मोठ्या प्रमाणात वाढली होती. अशा अवस्थेत बीएलओ म्हणून नियुक्त करण्यात आलेले प्रभाकर उंबरे, चेतन धुरंधरे आणि रमण कुलकर्णी या त्रिमूर्तीने ही किचकट प्रक्रिया अत्यंत चांगल्या पद्धतीने आत्मसात करून आतापर्यंत विनासायास पार पाडली आहे, असे प्रतिपादन मुक्त पत्रकार एस. एम. युसूफ़ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे यांनी केले आहे.
या तिघांनीही बीएलओ (BLO) म्हणून काम करताना आपल्या कर्तव्यात कोणतीही कसूर केली नाही. त्यांना दिवस-रात्र कधीही मतदारांनी फोन करून कोणतीही माहिती विचारली, तरीही चिडचिड न करता किंवा न वैतागता ते प्रत्येकाला अत्यंत नम्रपणे व सामोपचाराने माहिती देऊन एसआयआरचे काम १०० टक्के व्यवस्थितरित्या करत आहेत.
यामुळे ही प्रक्रिया सुरू होण्याअगोदर कधीही न भेटलेल्या व न ओळखणाऱ्या मतदारांनाही हे तिघे आपलेसे वाटू लागले आहेत. एसआयआर प्रक्रिया तंतोतंत पार पडावी आणि एकही पात्र मतदार मतदार यादीत नाव येण्यापासून वंचित राहू नये, ही बाब लक्षात घेऊन हे तिन्ही बीएलओ दिवस-रात्र अविरत परिश्रम घेत आहेत. त्यांच्या या तत्पर सेवेमुळे मतदारांचा त्रास व डोकेदुखी अत्यंत कमी झाली असल्याचे मत या निमित्ताने एस. एम. युसूफ़ आणि रमेशराव गंगाधरे यांनी व्यक्त केले आहे.

COMMENTS