बीड: महाराष्ट्र पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या 'निर्भीड पत्रकार संघा'च्या शिरूर कासार तालुका कार्यकारिणीची नुकतीच अधिकृत घोषणा करण्यात आली

बीड: महाराष्ट्र पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या ‘निर्भीड पत्रकार संघा’च्या शिरूर कासार तालुका कार्यकारिणीची नुकतीच अधिकृत घोषणा करण्यात आली. बीड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पदाधिकार्यांच्या बैठकीत या नव्या पदाधिकार्यांची निवड जाहीर करण्यात आली.
संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा रुचिता मलबारी यांच्या आदेशानुसार, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र ढाका यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष परमेश्वर सोळंके यांच्या नेतृत्वाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये प्रमोद निकम यांची तालुकाध्यक्षपदी, बाळकृष्ण मंगरूळकर यांची कार्याध्यक्षपदी, रामेश्वर क्षीरसागर यांची उपाध्यक्षपदी, राज कातकडे यांची सचिवपदी आणि अंबादास गोरे यांची संघटकपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी बोलताना, संघटनेच्या संविधानानुसार पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देणे, पत्रकारांच्या अडचणी शासन व प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, संघटनेचा विस्तार करणे तसेच निर्भीड आणि मूल्याधिष्ठित पत्रकारितेची परंपरा जपणे, ही नव्या पदाधिकार्यांची प्रमुख जबाबदारी राहणार असल्याचे सांगण्यात आले.
या बैठकीस प्रदेशाध्यक्ष देवेंद्र ढाका, जिल्हाध्यक्ष परमेश्वर सोळंके, जिल्हा उपाध्यक्ष आनंद वीर, शहराध्यक्ष इनामदार, महिला जिल्हाध्यक्ष किरण डोळस, युवती महिला जिल्हाध्यक्ष सारिका गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष मोनिका बेद्रे, जिल्हा संघटक ज्योती तुसमकर यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS